Protect Against Omicron Covid Variant | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर WHO ची गाईडलाईन आवश्य करा फॉलो, तेव्हाच राहाल सुरक्षित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Protect Against Omicron Covid Variant | कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कहर केला होता, आता त्याचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन कोरोनाची तिसरी लाट आणण्याची शक्यता आहे. कोरोना लवकर आपली साथ सोडणार नाही, त्यामुळे त्याच्यापासून बचाव करणे खूप गरजेचे आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस पुरेशी नाही, तर काही विशेष नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. (Protect Against Omicron Covid Variant)

 

या व्हायरसचा प्रभाव कमी करायचा असेल तर इम्युनिटी मजबूत (Immunity Booster) करा आणि WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हायरस समजून घेण्यासाठी जगभरात संशोधन केले जात आहे, तसेच त्याच्या संसर्गाची तीव्रता आणि लसीचा परिणाम समजून घेण्यासाठी चाचण्या सुरू आहेत.

 

कोविड-19 च्या बदलत्या स्वरूपाचा सामना कसा करायचा हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. डब्ल्यूएचओ कोरोनाच्या या प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी सतत मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे, ज्याचा अवलंब कोरोनाच्या ओमिकॉन प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो. (Protect Against Omicron Covid Variant)

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी WHO ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत ते जाणून घेऊया?

व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी एकमेकांपासून किमान 1 मीटर अंतर ठेवा.

मास्कबाबत निष्काळजी राहू नका. (Wear Mask)

योग्य मास्क घाला.

मास्क कधीही हनुवटीच्या खाली ठेवू नका.

नाक व तोंड पूर्णपणे झाकून ठेवावे.

व्हेंटिलेशन चांगले ठेवा.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

हात स्वच्छ ठेवा. हात वारंवार धुवा अन्यथा सॅनिटायझर वापरा.

लस अवश्य घ्या. लस स्थिती गंभीर होण्यापासून वाचवेल.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

बाहेर पडल्यास डबल मास्क वापरा.

 

ओमिक्रॉनच्या संसर्गामधून तुम्ही लवकर बरे होऊ शकतो, पण निष्काळजीपणा करू नका. लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करा आणि स्वतःला आयसोलेट करा. इम्युनिटी वाढवणारा आहार घ्या. आयुष मंत्रालयाने शिफारस केलेला काढ घ्या.

 

 

Web Title :- Protect Against Omicron Covid Variant | know whos guideline to protect against omicron variant then you will be safe AS

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास धमकावले; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Omicron Covid Symptoms |ओमिक्रॉनची सुरुवातीची लक्षणे कोण-कोणती आहेत? जाणून घ्या ती शरीरात किती दिवसात दिसतात