Protein deficiency Signs | प्रोटीनच्या कमतरतेची ‘ही’ 12 लक्षणे समजून घ्या, ताबडतोब सेवन करा ‘हे’ 10 पदार्थ

नवी दिल्ली : प्रोटीन (Protein deficiency Signs) शरीरासाठी खुप आवश्यक पोषकतत्व आहे आणि याच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. हे शरीराची मजबूती आणि विकासासाठी खुप आवश्यक आहे. प्रोटीन खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून मिळते आणि खराब डाएटमुळे लोकांमध्ये अनेक प्रोटीनची कमतरता (Protein deficiency Signs) जाणवते. प्रोटीन काय आहे, का आवश्यक आहे आणि याच्या कमतरतेमुळे काय होऊ शकते, जाणून घेवूयात…

रोज किती प्रोटीनची आवश्यकता

रोजची कॅलरी 10 ते 35 टक्के प्रोटीनमधून आली पाहिजे. व्यक्तीद्वारे आवश्यक किंवा वापरलेल्या एकुण कॅलरीवर अवलंबून आहे. बहुतांश लोकांना प्रति जेवण 20 ते 30 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नॉन-अ‍ॅथलीटला रोज शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅमला सुमारे 0.8 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. एका अ‍ॅथलीटला जास्त प्रोटीनची आवश्यकता असू शकते. तुम्हाला किती प्रोटीनची आवश्यकता आहे, हे तुमच्या डॉक्टरकडून जाणून घेवू शकता.

प्रोटीनची कमतरता असल्यास काय करावे?

प्रोटीनची कमतरता, ज्यास हायपोप्रोटीनेमिया सुद्धा म्हटले जाते, सामान्यपणे ही समस्या एकुणच कमी प्रोटीन सेवनाशी संबंधीत असते. तज्ज्ञांनुसार, शरीरावर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात, जी प्रोटीनच्या कमतरतेच्या गांभीर्यावर वेगवेगळी असू शकतात.

signs of protein deficiency early sign and symptoms of protein deficiency protein rich foods protein

सतत कमजोर, सतत थकवा, कमी प्रतिकारशक्ती, सतत भूक, केस गळणे, नाजूक नखे, कोरडी-खपल्यांसारखी त्वचा, पोट फुगणे, लिव्हरने काम बंद करणे, त्वचा खराब होणे, शारीरीक विकासात बाधा, पातळ हाडे.

प्रोटीच्या कमतरतेची इतर लक्षणे

सर्वात सामान्य संकेतांपैकी एक म्हणजे सूज (ज्यास एडिमा सुद्धा म्हटले जाऊ शकते) असू शकते. जी विशेषता पोट, पाय, डोळ्यांच्या आसपास आणि हातांवर दिसू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तुमच्या रक्तात प्रसारित होणारे प्रोटीन – अल्ब्यूमिन, विशेषता ऊतींमध्ये द्रव पदार्थ तयार होण्यास रोखतात.
डॉक्टर निदान करू शकतात की हे प्रोटीनच्या कमतरतेमुळे आहे की, इतर एडिमामुळे होत आहे.

प्रोटीनच्या कमतरतेची कारणे

कुपोषण, अपुर्‍या प्रोटीनचे सेवन, मूलभूत आरोग्य स्थिती जसे की सिलिएक किंवा क्रोहन रोग किंवा ऑटो-इम्यून डिसीज इत्यादीमुळे प्रोटीनची कमतरता होऊ शकते.

जर प्रोटीनची कमतरता असेल तर डॉक्टर तुम्हाला अतिरिक्त प्रोटीनचा डोस घेण्यास सांगू शकतात. मात्र, प्रोटीन सप्लीमेंट ऐवजी केवळ प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थांचे सेवन वाढवले पाहिजे.

प्रोटीनचे मुख्य खाद्यस्रोत
– मोड आलेले मूग
– सर्व प्रकारच्या डाळी (तूर, उडीद, चने, मसूर, मूग)
– ओट
– धान्य (क्विनोआ, दलिया)
– सूकामेवा, बी (बदाम, पिस्ता, काजू आणि अळशी)
– शेंगा (डाळी आणि बीन्स)
– अंडी – विशेषता अंड्याचा सफेद भाग (अंड्याच्या पिवळ्या भागात उच्च कोलेस्ट्रॉल असते)
– शेंगदाना बटर, शेंगदाणे
– मासे किंवा झींगा
– पोल्ट्री (चिकन किंवा टर्की)
– डेयरी उत्पादने (दही, पनीर, ग्रीक योगर्ट किंवा पनीर).

हे देखील वाचा

Coronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

 

Pune News | ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान,स्वतः कोरडे पाषाण’; NCP च्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमावरुन अजित पवार ‘ट्रोल’

 

MP Sanjay Raut | ‘राष्ट्रनिष्ठा’, ‘स्वामीनिष्ठा’ यावरून संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Protein deficiency Signs | signs of protein deficiency early sign and symptoms of protein deficiency protein rich foods protein

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update