Protein Diet | हेल्दी राहण्यासाठी शाकाहारी लोकांनी ‘डाएट’मध्ये सहभागी कराव्यात प्रोटीनने समृद्ध ‘या’ 7 भाज्या; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Protein Diet | प्रोटीन (Protein) शरीरासाठी एक आवश्यक पोषकतत्व आहे. शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये प्रोटीन असतात. त्वचा (Skin), रक्त (Blood), हाडे (Bones) आणि स्नायू (Muscle) पेशींच्या विकासासाठी प्रोटीन (Protein Diet) आवश्यक आहे. आहारात प्रोटीनचा समावेश करण्याचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणजे प्रोटीन युक्त भाज्यांचे सेवन (Consumption Of Protein Rich Vegetables) करणे. प्रोटीन युक्त भाज्या शरीरासाठी फायदेशीर (Protein Rich Vegetables Are Beneficial For Body) असतात.

 

प्रोटीनसाठी तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. त्यात हिरव्या पालेभाज्यांचाही (Green Leafy Vegetables) समावेश आहे. प्रोटीन इतर अनेक आरोग्य फायदे (Health Benefits Of Protein) देखील देतात. प्रोटीनसमृद्ध असलेल्या कोणत्या भाज्यांचा (Protein Rich Vegetables) आहारात (Protein Diet) समावेश करू शकता ते जाणून घेऊया.

 

1. पालक (Spinach)
पालकामध्ये भरपूर पोषक असतात. त्यात प्रोटीन असते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वोत्तम भाजी आहे. पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

 

2. ब्रोकोली (Broccoli)
ब्रोकोली ही फारशी लोकप्रिय भाजी नाही. पण ब्रोकोली खाल्लयाने प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळतात. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही ब्रोकोलीचे सेवन सॅलडच्या (Salad) स्वरूपातही करू शकता.

 

3. कोबी (Cabbage)
कोबीची भाजी केली जाते तसेच सॅलड म्हणून खाल्ली जाते. हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. 100 ग्रॅम ताज्या कोबीमध्ये सुमारे 1 ते 2 ग्रॅम प्रोटीन आढळतात. प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासोबतच ते पचन (Digestion) आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही (Heart Health) चांगले असते.

4. मशरूम (Mushrooms)
प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही मशरूमचे सेवन देखील करू शकता. मशरूमचा थंड प्रभाव असतो. यामुळे शरीरातील उष्णता दूर होते. मशरूममध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते.

 

5. बटाटा (Potato)
बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक भाजीत केला जातो. बटाटे हा प्रोटीनचाही चांगला स्रोत आहे. बटाटा करी आणि उकडलेले बटाटे (Boiled Potato) खाल्ल्याने शरीराला प्रोटीन सहज उपलब्ध होतात.

 

6. मटार (Green Peas)
बटाट्यांप्रमाणे, इतर अनेक भाज्यांमध्ये मटार देखील टाकले जाते. मटारमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळते.
यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म (Anti-oxidant Properties) असतात.
हे अल्झायमर (Alzheimer’s), मधुमेह (Diabetes) आणि कॅन्सरसारख्या (Cancer) आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात.

 

7. सोयाबीन (Soybean)
सोयाबीन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. हिरवे सोयाबीन प्रोटीनची कमतरता पूर्ण करते.
याशिवाय सोयाबीनचे दूध (Milk), टोफू (Tofu), सोया सॉस (Soy Sauce) आणि सोयाबीन पेस्टमध्येही (Soybean Paste) भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Protein Diet | protein diet to stay healthy vegetarians should add these protein rich 7 vegetables in diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

 

PM Kisan Samman Nidhi Yojana | खुशखबर ! सरकार शेतकर्‍यांना पुढील महिन्यात वाटप करणार 2000 रुपये, लाभ घेण्यासाठी Download करावे ‘हे’ विशेष App

 

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त