Protein Powder Desi Tip | बाजारात कशाला जायचे जर घरातच बनवता येते प्रोटीन पावडर? जाणून घ्या सेवनाचा Right Time

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Protein Powder Desi Tip | सर्व न्यूट्रिएंट्समध्ये प्रोटीन शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीन शरीराची अनेक प्रकारे देखभाल करते. वजन कमी करणे असो, फिट राहणे असो, एनर्जी लेव्हल वाढवणे असो किंवा मसल्स बिल्डिंग असो, या सर्वांमध्ये प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी, साधारण पदार्थांसह लोक प्रोटीन घेण्याकरिता प्रोटीन पावडरचा वापर करतात (Protein Powder Desi Tip). शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी डॉक्टर प्रोटीन पावडर देखील सुचवतात. त्याच वेळी, नियमित जिममध्ये जाणाऱ्यांसाठी हे एक चांगले सप्लीमेंट ठरू शकते (Prepare Protein Powder At Home).
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जर हार्ड वर्कआऊटनंतर तुम्ही प्रोटीन शेक घेत असाल तर यामुळे इम्युनिटी बूस्ट होते आणि मसल्स वेगाने बिल्ड होतात. पण अनेकजण बाजारातून विकत घेतलेली प्रोटीन पावडरच वापरतात. घरी प्रोटीन पावडर कशी तयार करता येते, ते जाणून घेवूयात.
प्रोटीन पावडर साहित्य (Protein Powder Ingredients)
घरी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी काही बदाम, १/२ कप अक्रोड, १/२ कप कच्चे शेंगदाणे, १/४ कप पिस्ता, १/४ कप काजू, २ मोठे चमचे खरबूजच्या कच्च्या बिया, २ चमचे भोपळ्याच्या बिया, २ चमचे सूर्यफूलाच्या कच्च्या बिया, १ मोठा चमचा जवसाच्या बिया, २ चमचे चिया सीड्स, १/४ कप खारीक. (Protein Powder Desi Tip)
अशी बनवा प्रोटीन पावडर (How To Prepare Protein Powder)
प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम बदाम नॉन-स्टिक पॅनमध्ये परतवून घ्या. मग अक्रोड, शेंगदाणे, पिस्ता, काजू, खरबूज, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि जवसाच्या बियांसाठी परतुन घ्या. आता हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चिया सीड्स आणि सुके खजूर घाला. मिश्रण ब्लेंडर जारमध्ये घेऊन बारीक पावडर करा. तुमची होममेड व्हेज प्रोटीन पावडर तयार आहे. याचे सेवन दुधासोबत करू शकता.
प्रोटीन शेक घेण्याची योग्य वेळ (Right Time To Take Protein Shake)
काही फिटनेस तज्ञांचे असे मत आहे की व्यायाम केल्यानंतर सुमारे १ तासानंतर प्रोटीन शेक घेणे आवश्यक आहे.
ही प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची योग्य वेळ आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त फायदा होतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Protein Powder Desi Tip | prepare protein powder at home and see which is best from market
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …
Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया
Pune Police News | सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील