Protein Rich Vegetables | मांस आणि अंडे आवडत नाही का? मग प्रोटीन मिळवण्यासाठी सेवन करा ‘या’ 5 भाज्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Protein Rich Vegetables | तुम्हाला संपूर्ण प्रोटीन मिळवायची असतील तर मांस, मासे आणि अंडी (Meat, Fish, Eggs) खाण्याची शिफारस केली जाते, परंतु प्रत्येकाला मांसाहार करणे शक्य नाही, कारण भारतात शाकाहारी लोकांची संख्या लक्षणीय आहे. अशावेळी शाकाहारी लोक प्रोटीनची गरज कशी भागवतात, असा प्रश्न उपस्थित होतो. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, काही भाज्या खाऊनही हे पोषक तत्व मिळवू शकता (Protein Based Vegetables).

 

प्रोटीन मिळविण्यासाठी या भाज्या खा (Eat these vegetables to get protein)

1. फुलकोबी (Cauliflower)
फार कमी लोकांना माहिती असेल की फुलकोबी खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळतात, त्याचप्रमाणे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर (Potassium, Magnesium, Fiber) देखील त्यात भरपूर प्रमाणात आढळते. जर तुम्ही हे नियमितपणे खाल्ले तर शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होत राहते.

 

2. पालक (Spinach)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक अतिशय पौष्टिक मानला जातो. यात केवळ प्रोटीनच नाही तर व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि फायबर देखील भरपूर असते. त्यामुळे पालकाचे नियमित सेवन करावे. (Protein Rich Vegetables)

 

3. बटाटे (Potatoes)
बटाटे खाल्ल्याने देखील प्रोटीन मिळू शकतात, यासाठी ते खास पद्धतीने शिजवावे लागते. चिरलेला बटाटा मंद आचेवर भाजून घ्या. यातून प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि पोटॅशियम देखील मिळेल.

 

4. ब्रोकोली (Broccoli)
जर तुम्हाला मांस आणि अंडी खायला आवडत नसेल तर तुम्ही ब्रोकोली खाण्यास सुरुवात करू शकता. ही एक आरोग्यदायी भाजी आहे ज्यामध्ये प्रोटीन व्यतिरिक्त आयर्न देखील मिळेल. ब्रोकोली उकळून किंवा कोशिंबीर म्हणून खाल्ल्यास फायदा होईल.

 

5. मशरूम (Mushrooms)
मशरूम हा एक महाग पर्याय असला तरी तो प्रोटीनचा समृद्ध स्रोत मानला जातो.
जर तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा खाल्ल्याने शरीरात प्रोटीनसह इतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Protein Rich Vegetables | protein rich vegetables roasted potato broccoli cauliflower spinach mushroom other than meat egg

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind Vs Pak Asia Cup 2022 | पाकिस्तान विरूद्ध प्लेईंग-11 मध्ये बदल निश्चित, रवींद्र जडेजा बाहेर, आता कुणाला मिळणार संधी ?

 

Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; दोन्ही गटाला सुनावलं

 

Pune Crime | 1 कोटींची फसवणूक करणार्‍या पुण्यातील सुप्रसिध्द वकिलावर गुन्हा दाखल