Protein Veg Food | ‘या’ 5 व्हेजिटेरियन वस्तूंमध्ये ‘चिकन लेगपीस’पेक्षा जास्त प्रोटीन, डाएटमध्ये करा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Protein Veg Food | प्रोटीन (Protein) केवळ स्नायू मजबूत करत नाहीत तर आपल्याला सक्रिय ठेवण्यासाठी भरपूर ऊर्जा (Energy) देखील देतात. अंडी (Eggs), मांस (Meat), मासे (Fish) यासारख्या मांसाहारी गोष्टी प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. म्हणूनच शाकाहारी (Protein Veg Food) लोकांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेबद्दल आरोग्य तज्ञांनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे.

 

शरीरातील प्रोटीनच्या गरजेबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय प्रोटीन दिवस (National Protein Day) देखील साजरा केला जातो. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला अशा 5 शाकाहारी गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्यात चिकन लेगपीसपेक्षा जास्त प्रोटीन (Protein Veg Food) असतात.

 

चिकन लेगपीसमध्ये 12.4 ग्रॅम प्रोटीन (12.4 Grams Of Protein In Chicken Leg Piece)
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, त्वचा (Skin) आणि हाडे (Bones) नसलेल्या चिकन लेगपीसमध्ये सुमारे 12.4 ग्रॅम प्रोटीन असते. तर काही शाकाहारी पदार्थांमध्ये यापेक्षा जास्त प्रोटीन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

1. डाळ (Dal) –
शाकाहारी थाळीमध्ये डाळ हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. जेव्हा सहज उपलब्ध शाकाहारी प्रोटीनचा विचार केला जातो, तेव्हा तुम्हाला यापेक्षा चांगला पर्याय सापडणार नाही. एका कप उकडलेल्या डाळीमध्ये सुमारे 17.86 ग्रॅम प्रोटीन आढळते. त्यात पोटॅशियम (Potassium), फायबर (Fiber) आणि फोलेटचे (Folate) प्रमाणही जास्त असते.

 

2. हरभरे (Gram) –
शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी हरभर्‍याचा आहारात समावेश करावा. एक कप उकडलेल्या हरभर्‍यामध्ये सुमारे 14.53 ग्रॅम प्रोटीन आढळते. यात कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates), अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Unsaturated Fatty Acid) या सारखे पोषक घटक देखील असतात. तुम्ही ते सूप, भाजी किंवा पिठाच्या स्वरूपात वापरू शकता.

3. शेंगदाणे किंवा बदाम (Peanuts or Almonds) –
प्रोटीनसाठी, शाकाहारी लोक शेंगदाणे किंवा बदाम देखील घेऊ शकतात. अर्धा कप शेंगदाण्यामध्ये सुमारे 20.5 ग्रॅम प्रोटीन असतात. तर अर्धा कप बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीराला सुमारे 16.5 ग्रॅम प्रोटीन मिळतात.

 

4. मूग (Mung Bean) –
मूगामध्ये आयर्न (Iron) आणि फायबरसह प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. एक कप उकडलेल्या मूगमध्ये सुमारे 14.18 ग्रॅम प्रोटीन आढळतात.
नाश्त्यामध्ये याचा समावेश केल्यास शरीराला अनेक मोठे फायदे मिळू शकतात.

 

5. शेंगभाज्या (Beans) –
किडनी बीन्स (Kidney Bean), चवळी (Black-Eyed Peas Beans) किंवा विविध प्रकारच्या बीन्स यासारख्या शेंगांमध्येही भरपूर प्रोटीन असतात.
एक कप शेंगांमध्ये 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन असतात. याव्यतिरिक्त, त्यामध्ये पोटॅशियम (Potassium), फायबर आणि आयर्न देखील चांगले असते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Protein Veg Food | 5 vegetarian foods have more protein than chicken leg piece

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fatty Liver Symptoms | लिव्हर खराब झाल्यास तोंडातून येते भयंकर दुर्गंधी, लवंग-वेलची खाण्याऐवजी ताबडतोब जा डॉक्टरकडे

 

Pune Crime | दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू; पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील घटना

 

HDL Cholesterol Level | न्यूट्रिशनिस्टने सांगितले शरीरात ‘गुड कोलेस्ट्रॉल’ वाढवण्याचे 5 सोपे उपाय, हार्ट अटॅक-स्ट्रोकपासून होईल बचाव