बेळगावात CM उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ‘दहन’, शिवसेना – कनसे ‘वाद’ चिघळणार ?

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसैनिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कन्नड ध्वजाचे दहन केल्याचे पडसाद आज बेळगावात उमटले. शिवसैनिकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केले. ही बातमी बेळगावात पोहचल्यावर कन्नड संघटनांनी एकत्र येऊन सर्किट हाऊस परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्ध घोषणा देण्यात आल्या.

बेळगाव दौऱ्यावर आलेल्या निजद नेते आणि माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे नाही तर उपदव्यापी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याची टीका कर्नाटकचे माजी मंत्री आणि निजद नेते बसवराज होरट्टी यांनी केली. होरट्टी म्हणाले की सीमा प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रपेक्षा एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.

होरट्टी यावेळी म्हणाले की बेळगावचे खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी सीमाप्रश्नाबाबत बोलत नाहीत. म्हादइ असो किंवा सीमाप्रश्न या बाबत राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबत दोन मंत्री नेमून सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. मी भाजपात जाणार अशी चर्चा मागील चार वर्षापासून आहे. येडीयुरप्पा यांनी दोन वेळा भाजपात येण्याचे आमंत्रण दिले होते पण मी निजद सोडून कुठे जाणार नाही.

धैर्यशील मानेनी दिला इशारा –
धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेला इशारा दिला की महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकही कार्यकर्त्याला केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पुढील भूमिका घेणार असल्याचे धैर्यशील मानेंनी सांगितले. विकृत संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही धैर्यशील माने यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/