राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याच्या निषेध करत लासलगावला काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको

लासलगाव वार्ताहर – हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याने थेट पायी निघालेल्या या दोघांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे नाशिक जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील कोटमगाव चौफुलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री आदिनाथ योगी आणि भाजप विरोधी घोषणाबाजी करत केला रास्तारोको केला यावेळी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होता.

2 ऑक्टोबर रोजी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धरणे आंदोलन प्रसंगी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी विरोधी बिला विरोधात निषेध करत आज राहुल गांधी यांना धक्का बुक्की झाल्या प्रकरणी लासलगाव-विंचूर चौफुलीवर रस्ता रोको करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे,नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर, राजाभाऊ शेलार,जिल्हा सरचिटणीस दिगंबर गीते,रमेश कहांडळ ,भैया देशमुख,प्रकाश अडसरे,साहेबराव ढोमसे,मधुकर शेलार,गुणवंत होळकर,डॉ.विकास चांदर, सचिन होळकर,मिरण पठण,योगेश डुकरे,सुहास सुरळीकर,सुनील निकाळे, सचिन खरताळे,अस्लम पठाण,सतीश पवार आदी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like