Tandav मुळं सोशलवर ‘तांडव’ ! नेटकऱ्यांसोबत अनेक भाजप नेत्यांची प्रकाश जावडेकरांकडे वेब सीरिज बॅन करण्याची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडिायावर याला विरोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. असाही दावा केला जात आहे की, ही सीरिज जेएनयुच्या कथित टुकडे टुकडे गँगचं समर्थन करत आहे. यावरून आता वाद सुरू झाला आहे.

सोशल मीडियावर सतत ही वेब सीरिज बॅन करण्याची मागणी केली जात आहे. आता यात अनेक राजकीय नेते खास करून भाजप नेते हेही सहभागी झाले आहेत. कपिल मिश्रा, नरेंद्र कुमार चावला, गौरव गोयल, योगी बालकनाथ सहीत अनेक भाजप नेत्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग करत वेब सीरिज बॅन करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड झाला #BanTandavNow

शनिवारी सोशल मीडियावर #BanTandavNow हा हॅशटॅग दुसऱ्या नंबरवर ट्रेंड होताना दिसला. दुपारी साडे तीनच्या दरम्यान जवळपास 1.65 लाख ट्विट करण्यात आले आहेत. असा दावा केला जात आहे की, सीरिजमध्ये भगवान शंकराचा अपमान केला आहे आणि राष्ट्रविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देखील दिलं आहे.

अशा पोस्ट शेअर करत भाजप नेत्यांनी केला विरोध

दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांनी सोशलवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, तांडव दलितविरोधी आणि हिंदुंविरोधी सांप्रदायिक तिरस्करानं भरलेली आहे. त्यांनी आयएनबी मिनिस्ट्रीचा मेल आयडी शेअर केला आहे आणि सोबत फॉलोवर्सला अपील केलं आहे की, तांडववर प्रतिबंध घालण्यासाठी प्रकाश जावडेकरांच्या नावे पत्र लिहा.

दिल्लीतील भाजप नेते नरेंद्र कुमार चावला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, हा ट्रेंड पाहून मीही तांडव बॅन करण्याची मागणी करतो.

चंदीगढ भाजपचे प्रवक्ता गौरव गोयल यांनी तांडवविरोधात अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये ते म्हणतात, यावेळी तांडवच्या निर्माता आणि डायरेक्टर यांना अभय दिलं जाणार नाही. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

योगी बालकनाथ यांनी लिहिलं की, मी तांडव बॅन करण्याची मागणी करतो.

बिहरा भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मिथिलेश कुमार तिवारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, मी प्रकाश जावडेकर यांना अपील करतो की, त्यांनी ताबडतोब अ‍ॅक्शन घ्यावी आणि तांडवर सीरिज बॅन करावी.

भाजप नेता हरिओम पांडे यांनी लिहिलं की, प्रकाश जावडेकर जी प्लिज या बकवास वेब सीरिजला बॅन करा. ही युवकांना चुकीची दिशा दाखवत आहे. भारताविरोधी गुपचूप ही सीरिज राष्ट्रविरोधी अजेंडा चालवत आहे.