केंद्र सरकारच्या विरोधात चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन

चंद्रपुर : पोलीसनामा ऑनलाइन  –  केंद्र सरकार ने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाच्या विरोधात आज दि.16 संप्टेबर रोजी चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेट समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

जगभरात लाॅकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकर्याने कांद्याचे उत्पादन घेतले.कांद्याला आता कुठे चांगला भाव येवु लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकर्यांना होती. परंतु केंद्रातील लहरी मोदि सरकार ने अचानक निर्यात बंदि जाहिर करून शेताकर्यांवर घोर अन्याय केलेला आहे. तिन महिन्या पुर्वी दि.4 जुन रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळ या जीवनावश्यक वस्तुंना यादीतून वगळले असल्याचे घोषना करून स्वताची पाठ थोपटून घेतली होती. आणि तीन महिन्यात घुमजाव निर्णय बदलून शेतकर्यावर अन्याय केला आहे. असा आरोप चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी या वेळी केला.या निर्णया मुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचे देवतळे म्हणाले या वेळी कांदा निर्यात बंदीच्या निर्णय केंद्र सरकार ने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलणा दरम्यान सामाजिक अंतराचे नियम पाळण्यात आले. सदर आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हा अध्यक्ष रामु तिवारी, माजी शहर जिल्हा अध्यक्ष नंदु नागरकर, अल्पसंख्याक अध्यक्ष सुलेमान अली, युवक विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, महिला शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, जिल्हा महासचिव किशोर आवळे, अनिल भोयर, ए.सी.सेल चे अध्यक्ष कुनाल रामटेके, सोशल मीडियाचे सुलतान अली, जिल्हा सचिव हरिदास लांडे, रूपेश देरकर, आशिष ऊराडे, माजी नगरसेविक एकता गुरले, मनोज यादव, समीर शेख,व इतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.