हिंदुत्ववादी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी फिती बांधुन निषेध मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागले. शहरात काल दुपारी शंभरफुटी रस्ता चौफुली समोर एका जमावाच्या गटाने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनवर हल्ला चढवत दोन पोलीसांन जवळील मोटरसायकली जाळुन टाकल्या. पोलीस वाहनावर परिसरात काचेच्या बाटल्या, दगड, विटा मारा केला रस्त्यावर मुरुम टाकुन वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. यात तीन अधिकारी व बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले.

dhule collector

त्याचाच निषेध करण्या करीता आज गुरवारी पाच वाजे दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने चाळीस गाव रोड छञपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून मोर्चाला सुरवात करण्यात आली. यात काळ्या फिती बांधुन निषेध करत विविध निषेध घोष वाक्य लिहिलेले फलक घेत स्ञी , पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भ्याड हल्ल्याचा निषेध असो दोषीवर कारवाई करा विविध घोषणा देत मोर्चा खंडेराव बाजार चौक, पाचकंदिल चौक, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, जुना आग्रा रोड मार्गाने रणसिंग चौकातून पारोळारोड, जुनी मनपा, झाशीराणी चौक, जुने कलेक्टर कार्यालय जवळुन जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आला. तिथे मोर्चातील मुख्य पदाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांना लेखी निवेदन देत भारत बंद दरम्यान हिंसा घडवून आणणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोह/मोक्का अतंर्गत गुन्हे दाखल करा, पुढे कोणाला हि आंदोलना बाबत परवानगी देऊ नये. काल जमाव हल्ल्यात नुकसान झालेल्या व्यवसायिकांना बँक अधिकारी कडुन सवलत मिळुन द्यावी. कोणत्याही लोकप्रतिनिधीची गय करु नये. समसमान चौकशी करुन घरांची झडती घेऊन दोषींना पकडुन कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते.