तहसिलदार कचेरीवर आक्रोश मोर्चा धडकला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – आदिवासी समाजावरील अन्याय थांबवावा, शासन आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते इत्यादी मुद्द्यांवरून आदिवासी समाज बांधवाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

आदिवासी समाजाच्या वतीने विविध ८ मागण्यांसाठी आज मंगळवारी आदिवासी बांधव शहरातील फाशीपुल चौकात एकञ जमले. तेथुन आक्रोश मोर्चाला सुरवात झाली. ह्या मोर्चात आदिवासी बांधवांनी आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्चा खाली करा, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे घोषणा देत मोर्चा महात्मा फुले पुतळा, पोलीस मुख्यालय, बस स्थानक, जेल रोड मार्गाने तहसिलदार कार्यालयावर नेला. मोर्चातील कार्यकर्त्यांनी तहसिलदार कार्यालयासमोर रस्त्यावर दिड तास ठिय्या आंदोलन केले.

आदिवासी बांधव यांनी निवेदनात लोणखेडी, वैजापुरात बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, वनजमीनचे दावे निकाली काढावे, ७/१२ उतारे मिळावे, खावटी कर्ज वाटप करावे, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, एकलव्याचा पुतळा उभारा अशा विविध मागणीचे निवेदन नायब तहसिलदार नरेंद्र उपासनी यांना दिले. मोर्चाचे नेतृत्व अशोक धुलकर, जीवन चव्हाण, भरत जाधव, संदिप मोरे, देवसिंग सोनवणे, राजकुमार सोनवणे, राज वळवी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त