पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे धरणे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भिमा कोरेगाव दंगलीमधील बळी ठरलेल्या पूजा सुरेश सकट हिच्या खुन्याचा गुन्हेचा तपास आत्महत्या ठरवून पोलीस प्रशासनाने अन्याय केल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

पूजा सकट हिच्या खुन्याचा गुन्ह्याचा तपास सी.बी. आय. मार्फत चौकशी आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी. पूजा सकट हिच्या कुटुंबियांना तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. भिमा कोरेगाव दंगलीमधील पूर्व नियोजित कटात सहभागी असणारे समाजकंटक व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

या धरणे आंदोलनात रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते रामभाऊ डंबाळे , सविता सिंग , भागवत कांबळे , विशाल रेड्डी , सिध्दार्थ सुर्वे , भरत मिरेकर, मुमताज शेख, दत्ता ढवळे, प्रदीप कांबळे, उध्दव कांबळे, विकास ढावरे, निलेश लोंढे, परशुराम चव्हाण, सचिन कांबळे व लता शिंगारे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.