राज्यातील डॉक्टरांचे आंदोलन ; ‘हेल्मेट’ घालून करणार निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोलकत्ता शहरातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि इंटर्न लोकांची संघटना (ASMI) मिळून आंदोलन करणार आहेत. उद्या दिवसभर हातात काळी रिबीन बांधून आणि हेल्मेट घालून राज्यातील रुग्णालयांमध्ये या घटनेचा निषेध केला जाणार आहे. तसेच केवळ आपत्कालीन सेवाच पुरविण्यात यावी आणि बाकी कामकाज बंद ठेवावे असे देखील आवाहन या संघटनांतर्फे करण्यात आहे आहे.

नेमके काय आहे कोलकात्त्यातील प्रकरण :

पश्चिम बंगालमधील कोलकत्ता शहरात एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका वृद्धाचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना मारहाण केली. डॉ. पारिबहा मुखोपाध्याय आणि डॉ. यश टेकवाणी अशी या डॉक्टरांची नावे असून यातील एक निवासी तर एक इंटर्न डॉक्टर आहे. संपूर्ण देशभरातून या हल्ल्याचा निषेध होत असून महाराष्ट्रातील डॉक्टरांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD)आणि इंटर्न लोकांची संघटना (ASMI) यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला असून डॉक्टरांना न्याय देण्यासाठी उभे राहणारच अशी भूमिका घेतली आहे. मार्डचे ४५०० आणि अस्मिचे २५०० डॉक्टर आंदोलन करणार असल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

यानिमित्ताने महाराष्ट्रातील इंटर्न डॉक्टरांच्या देखील समस्या पुढे येत असून त्यांच्या मागण्यांना देखील जोर येण्याची शक्यता आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि मागील वर्षी इंटर्न डॉक्टरांची तात्काळ पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण झालेले नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टरांचे वेतन अगदीच कमी म्हणजे केवळ ६००० इतके आहे. शासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही काही फायदा झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शासकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर आणि ASMI संघटनेची नाराजी वाढत आहे.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ