धुळे : प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद कर्मचारी यांनी राज्यात भोजन अवकाश काळात प्रलंबित मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज (मंगळवारी) दुपारी जिल्हा परिषदतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी घंटानाद आंदोलन केले.

यावेळी ‘आमच्या मागण्या हक्काच्या’ अशा घोषणा देत आवारात घंटानाद करत जोरदार घोषणाबाजी केली. दहा मागण्या ह्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात आंदालने करण्यात आली. शासनाने सगळ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळावून द्यावा. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जे.एन.आभाळे यांना देण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष दिनेश महाले, माजी अध्यक्ष बलराज मगर यांनी केले. यावेळी सोबत डि.एम पाटील, राहूल पवार, किशोर पगारे, एकनाथ चव्हाण, महिला अध्यक्षा रंजना साळुंखे ज्ञानेश्वर पाटील व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा…होतील हे चांगले परिणाम

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

केसांचे नुकसान का होते ? जाणून घ्या या समस्येमागील कारणे

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्रष्टाचार, सभापतींचे चौकशीचे आदेश