कर्णबधीर आंदोलकांची रात्र आंदोलनस्थळीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर काल लाठीमार झाला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला. लाठीमार झाल्यानंतर आंदोलकांनी आणखी तीव्रतेने आंदोलन करण्याचा ठाम निश्चय केला आहे. आंदोलकांनी संपुर्ण रात्र आंदोलनस्थळी म्हणजेच समाज कल्याण आयुक्तालयासमोर काढली.

राज्यभरातून आपल्याला शिक्षण व नोकरी मिळण्यात येणाऱ्या समस्या आणि त्या सोडविण्याच्या विविध मागण्या घेऊन कर्णबधीर आंदोलकांनी काल सकाळी समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाची सुरुवात केली. राज्याच्या अपंग आयुक्त पदावरून बालाजी मंजुळे यांची अवघ्या दोनच महिन्यात बदली केल्याने कर्णबधीर असोशिएशनतर्फे निषेध करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही लेखी हमी मिळाली नाही.

त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा आता मुंबईकडे पायी नेण्याचा निर्धार केला. मात्र ते आयुक्लयापासून निघाल्यार पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विविध राजकिय पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. आंदोलकांनीही यासंदर्भात आणखी ठाम भुमीका घेत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय़ घेतला. त्यानतंर त्यांनी संपुर्ण रात्र आयुक्लायलयासमोर काढली. पाचशे ते सातशे आंदोलक रात्रभर येथे बसून होते. पहाटे अडीचच्या सुमारास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. परंतु त्यांच्यासोबत कर्णबधीरांची भाषा समजणारा दुभाषी नसल्याने काही समजू शकले नाही. त्यामुळे ते आता पुन्हा सकाळी त्यांची भेट घेणार आहेत.

आंदोलकांवरील गुन्हे मागे

पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ते मागे घेण्यात आले. तर पोलीस आय़ुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.