चायनीज वस्तू जाळून लासलगावमध्ये विरोध

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथे ब्राम्हण महासंघाच्या वतीने चीन चा विरोधात करण्यासाठी शहरातील सुभाष चौकात चिनी विदेशी वस्तू जाळून निषेध केला कोरोनाचा प्रसार चीनने जाणूनबुजून केला असून या चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा सर्वानी त्याग केला पाहिजे चिनी वस्तूंमधून मिळणाऱ्या पैशांचा आपल्या देशाच्या सैनिकांविरोधात वापर केला जात असल्याने केंद्र सरकारने तातडीने चीन येथून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी ब्राम्हण महासंघाच्या वतीने केली

आज ब्राह्मण महासंघाने चीन मालावर बहिष्कार घालण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाची सुरवात क्रांतिकारकांच्या स्मृतिस्थळाजवळून घेण्याचे ठरवले. लासलगाव येथील जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै. प्रभाकर पंत कुलकर्णी यांनी जी देशसेवा आझाद हिंद सेनेत राहून केली त्या सेवेमुळे ज्या चौकाला सुभाष चौक नाव दिले त्या चौकात आज ब्राह्मण महासंघाने चिनी माल निषेध केला.भारतावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले होते. भारतातिला लोकांनी ठरवले तर काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे निषेध, आंदोलनातून भारताला आझदी मिळाली आहे. आज हीच वेळ आहे चीनला धडा शिकवण्याची चिनी मालाचा निषेध करून स्वदेशी वस्तूंचा वापर करा.आज संपूर्ण जगावर जे संकट आले आहे त्याचे एकमेव कारण चीन आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन चीन मालाचा बहिष्कार करून आत्मनिर्भर भारत बनवू या आजपर्यंत चा इतिहास साक्षीला आहे.

क्रांतीकारकांची आंदोलन कधी निष्क्रिय ठरली नाहीत समस्त भारतीय नागरिकांनी ठरवले तर आज आपण चीन ला धडा शिकवू शकतो चीन आपली गरज नाही आपण चीनची आवश्यकता आहोत .संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या प्रेरनेने संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच वेळी सोशल डिस्टन्स चे पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात आला असे प्रदेश कार्यध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले या प्रसंगी स्मिता कुलकर्णी, नामको बँक संचालक प्रकाश जी दायमा, जिल्हा युवा अध्यक्ष गणेशजोशी, अक्षदा जोशी, राजेंद्र कुलकर्णी, प्रथमेश कुलकर्णी, मयूर भंडारी, रजनी कुलकर्णी, मंदार खानापूरकर, निशांत केंगे.