Diet Tips : अंडे आणि पनीरमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये जास्त आहे ‘प्रोटीन’ ? शरीरयष्टी बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कोणतं ‘बेस्ट’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा बॉडी बनवायची असेल तर प्रोटीनची खुप आवश्यकता असते. प्रोटीन हाडे, मांसपेशींच्या निर्मिती आणि शरीराच्या अन्य कामात खुप जरूरी आहे. अंडे आणि पनीर प्रोटीनचे लोकप्रिय आणि चांगले स्त्रोत आहेत. प्रोटीनशिवाय, अंडे आणि पनीरमध्ये कॅल्शियम, बी 12 आणि आयर्नसारखी पोषकतत्व भरपूर असतात. परंतु, हा प्रश्न आहे की, दोन्हीपैकी सर्वात चांगले काय आहे.

अंड्यातील पोषकतत्व
अंडे व्हिटॅमिन ए, बी, ई, आणि के चे चांगले स्त्रोत आहे. अंड्याच्या पिवळ्या भागात अनेक आरोग्यदायी पोषक तत्व असतात. यात प्रोटीनशिवाय कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी 6, फोलेट, व्हिटॅमिन बी आणि झिंक तसेच अन्य आवश्यक पोषकतत्व असतात. अंड्यात सुमारे 70 कॅलरीज असतात. हे ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवते.

एका उकडलेल्या अंड्याचे वजन 44 ग्रॅम असते आणि पोषकतत्व खालीलप्रमाणे –
प्रोटीन : 5.5 ग्रॅम
कुल फॅट : 4.2 ग्रॅम
कॅल्शियम : 24.6 मिलीग्रॅम
आयर्न : 0.8 मिलीग्रॅम
मॅग्नेशियम : 5.3 मिलीग्रॅम
फॉस्फरस : 86.7 मिलीग्रॅम
पोटॅशियम : 60.3 मिलीग्रॅम
झिंक : 0.6 मिलीग्रॅम
कोलेस्ट्रॉल : 162 मिलीग्रॅम
सेलेनियम : 13.4 माइक्रोग्रॅम (एमसीजी)

पनीरमधील पोषकतत्व
पनीरमध्ये व्हिटॅमिन बी 12, सेलेनियम, व्हिटॅमिन डी आणि रायबोफ्लेविनसारखी पोषकतत्व असतात. सोबतच प्रोटीन आणि वसा असतात. तसेच कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, फोलेटसारखी न्यूट्रीएंट्स असतात, जी गरोदर महिला आणि बाळासाठी आरोग्यदायी ठरतात.

40 ग्रॅम पनीरमधील पोषकतत्व
प्रोटीन : 7.54 ग्रॅम
फॅट : 5.88 ग्रॅम
कार्ब्स : 4.96 ग्रॅम
फोलेट्स : 37.32 माइक्रोग्रॅम
कॅल्शियम : 190.4 मिलीग्रॅम
फॉस्फरस : 132मिलीग्रॅम
पोटॅशियम : 50 मिलीग्रॅम

या गोष्टी लक्षात ठेवा
अंडे आणि पनीर, दोन्हीमध्ये कमी जास्त समान पोषकतत्व असतात. प्रोटीनशिवाय अनेक व्हिटॅमिन, खनिज असतात. दोन्ही आरोग्यासाठी लाभदायक आहेत. हे सांगणे अशक्य आहे की कोण सर्वात चांगले आहे.