अभिमानास्पद ! ‘ब्रिटन’च्या राणीच्या सल्लागार पदी ज्येष्ठ वकील ‘हरिश’ साळवेंची ‘नियुक्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुलभूषण जाधव प्रकरणातील वकील हरिश साळवे यांनी पाकिस्तानाला तोंडावर पडत भारताची भक्कम बाजू मांडली. आता हेच मराठमोळे हरिश साळवे परदेशात आपली अव्वल कामगिरी करुन दाखवणार आहेत. भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठी क्विन कौन्सिल म्हणून पाहण्यासाठी नियुक्ती झाली आहे. हरिश साळवे यांची आधिकृतपणे नियुक्ती 16 मार्च रोजी करण्यात येईल.

ब्रिटिश सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराणीने 114 वकिलांना नियुक्त केले आहे. तसेच 10 वकिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. द हेग येथील कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे हरिश सावळे यांची थेट ब्रिटनच्या महाराणींचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. जी भारतासाठी अभिमानाची बाब आहे. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्ध केली. त्यात हरिश सावळे यांचा देखील समावेश आहे.

महाराणीचे सल्लागार म्हणून 114 बॅरिस्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात 144 पैकी 30 महिला, 22 बिगर ब्रिटन वंशाचे, 26 सल्लागार, 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, 4 सॉलिसिटर अ‍ॅडव्होकेट या पदांसाठी जवळपास 258 अर्ज आले होते, त्यातील 114 जणांची नियुक्ती झाली आहे. 16 जानेवारीला होणाऱ्या शाही समारंभात त्यांची औपचारिक नियुक्ती केली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like