कष्टाचं सोनं केलं, अप्पर पोलीस अधीक्षकांच्या आई-वडिलांनी सांगितलं

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कष्ट करुन मुलाला शिकवलं, मुलानं देखील आपल्या आई-वडिलां (father-mother)  च्या कष्टाचं सोनं केलं. मुलगा शिकून मोठा अधिकारी (officer) झाला आणि तो जिल्ह्यातच रुजू झाला. मुलगा आपल्याच जिल्ह्यात मोठा अधिकारी म्हणून रुजू झाल्याचा अभिमान आई-वडिलांना (father-mother) असणारच. मुलानं आमच्या कष्टाचं सोनं केल्याची भावना आणि तो जिल्ह्यात रुजू झाल्याचा अभिमान असल्याचे अपर पोलीस (police) अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या आई-वडिलांनी सांगितले आहे.

अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी नुकताच नगरचा पदभार स्विकारला. आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची आई जमुनाबाई आणि वडिल उद्धवराव हे पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. त्यांनी आपल्या मुलाला आशीर्वाद देत आपल्या मुलाचे कार्यालय डोळे भरुन पाहिले. डॉ. राठोड यांचे मुळ गाव पाथर्डी तालुक्यातील शिरापूर आहे.

यावेळी डॉ. राठोड यांनी आपल्या आई-वडिलांचे दर्शन घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले, आई निरक्षर तर वडील हे पहिली शिकलेले आहत. आयुष्यभर त्यांनी ऊसतोडणी मजुरीसह अनेक कष्टांची कामे केली. मात्र, मुलांनी शिकून मोठं व्हावं, असे त्यांचे स्वप्न होते. माता-पित्यांचे खडतर परिश्रम मी आयुष्यात कधीच विसरलो नाही. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते मला प्रेरणा व ताकद देतात असे त्यांनी सांगितले.