अभिमानास्पद ! भारतीय नौदलाच्या ताफ्यात शक्तिशाली INS वागीर पाणबुडी दाखल

नवी दिल्ली : आयएनएस वागीर ही नवीन शक्तिशाली पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या पाणबुडीच्या आगमनाने भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. मुंबईतील माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्सने ही पाणबुडी नौदलाकडे सुपूर्द केली तत्पूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वागीर पाणबुडीचे उद्घाटन केले.

पाचव्या श्रेणीची पाणबुडी ’आयएनएस वागीर’ गुरुवारी दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक येथे आयएनएस वजीर समुद्रात सोडण्यात आली. या पाणबुडी शत्रूच्या रडारवर येऊ शकत नाही, यासाठी तिच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

आयएनएस वागीर विषयी माहिती देताना नौदलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे, युद्धामध्ये ती प्रभावी ठरणार आहे. ती समुद्रात सुरुंग ठेवण्यास आणि देखरेख करण्यासाठी देखील ती सक्षम आहे. तर माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीएल) या कामाबात सांगितले की, स्कॉर्पेन पाणबुड्यांचे बांधकाम एमडीएलसाठी आव्हानात्मक होते. कारण कमी जागेत कामकाज सहज झाल्याने ते आव्हानात्मक बनले.

आयएनएस वागीरची माहिती

* या पाणबुडीचे नाव हिंद महासागरातील शिकारी मासा ’वागीर’ यावरून ठेवले आहे.
* रशियाकडून खरेदी करण्यात आलेली पहिली वागीर पाणबुडी 3 डिसेंबर 1973 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती. तीन दशकांच्या सेवेनंतर 7 जून 2001 रोजी ती सेवामुक्त झाली.
* वागीर पाणबुडी ही भारतात तयार होणार्‍या सहा काळवेरी-वर्ग पाणबुडींचा एक भाग आहे.
* वागीर पाणबुडीची रचना फ्रेंच सागरी संरक्षण व ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी केली आहे.
* भारतीय नौदलाच्या प्रकल्प 75 अंतर्गत हे काम सुरू आहे.