काय सांगता ! होय, पाकिस्तान ATC नं केली भारतीयांची ‘प्रशंसा’, म्हणाले – ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’

 पोलीसनामा ऑनलाइन –  परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यात भारतीय विमान कंपनीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. हे पाहून पाकिस्ताननेही भारतीयांची प्रशंसा केली. ‘कठीण परिस्थितीत करत असलेल्या मदतीसाठी आम्हाला तुमचा अभिमान आहे’, अशा शब्दांत पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने एअर इंडियाची स्तुती केली आहे.

लॉकडाउनमुळे भारतात अडकलेल्या युरोपीयन नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने फ्रँकफर्टला पोहोचविण्यात आले. हे विमान जेव्हा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेले होते. तेव्हा पाकिस्तान एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून भारतीयांची प्रशंसा करण्यात आली. यासंबंधीची माहिती देत एअर इंडियाचे वरिष्ठ कॅप्टन म्हणाले, पाकिस्तानच्या हद्दीत आमचे विमान गेल्यानंतर अस्सलाम वालेकुम म्हणत आमचे स्वागत केले. अशा कठीण परिस्थितीतही तुम्ही विमानाचे उड्डाण करत आहात.

त्यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे म्हणत पाकिस्तानच्या एटीसीने कौतुक केलं. त्यानंतर भारतीय वैमानिकानेही पाकिस्तानच्या एटीसीचे आभार मानले. दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता 3हजार 374 वर पोहोचला आहे. तर यामुळे 77 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 267 रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.