Covid-19 : ‘कोरोना’ व्हायरसचा ‘संसर्ग’ काही लोकांना पटकन का होतो ?, संशोधकांनी शोधलं कारण, जाणून घ्या

चेन्नई : वृत्त संस्था – काही लोकांना अगदी सहज कोरोनाची लागण का होते आणि काही लोक यातून लवकर कसे बरे होतात, या प्रश्नांचे उत्तर संशोधकांनी शोधले आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेने सिद्ध साहित्याचा आढावा आणि संशोधनानंतर या शंकेचे निरसन करण्यासाठी याक्काई इलाक्कनम (यी) पद्धत आणली आहे. याचे लक्ष्य एका ठोस निष्कर्षावर येण्यासह, शंका आणि चिंता दूर करणे आहे.

यामध्ये मानवी शरीराच्या तीन खंडांचा उल्लेख आहे. प्रत्येक खंडात शारीरिक, मानसिक आणि शरीराची काम करण्याची पक्रिया आहे. यी पद्धत 33 प्रश्नांची प्रश्नावली आहे, जे सिद्ध साहित्याच्या सुमारे 260 प्रश्नातून काढण्यात आले आहेत. केंद्रीय वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन संस्थेचे (उडठख) प्रभारी संचालक डॉक्टर पी सत्यराजेश्वरन यांनी म्हटले की, यी म्हणजे याक्काई इलाक्कनम आहे, ज्याचा अर्थ शरीर संघटीत असते. ही संशोधीत पद्धत सिद्ध संकल्पनेवर आधारित आहे. आणि आम्हाला आढळले की, यी पद्धत आणि कोविड-19 मध्ये संबंध आहे.

कोरोनामध्ये कोणता पोषक आहार उपयोगी
त्यांनी म्हटले की, यातून कोविड-19 च्या काळात रूग्णाची स्थिती समजण्यासाठी महत्वाची माहिती मिळते. सध्यस्थितीत ही प्रश्नावली तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवली जात आहे आणि 10 जिल्ह्यात काम करत असलेल्या डॉक्टरांनी ती मागितली आणि मिळवली. डॉक्टरांनी रूग्ण, स्वयंसेवकांकडून मिळालेली उत्तरे लिहिली. केंद्रीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे महासंचालक डॉक्टर के कनाकावल्ली यांनी म्हटले की, या पद्धतीने डॉक्टरांना रूग्णांना योग्य उपचार देण्याच्या निर्णयात सहायता मिळते. संक्रमित व्यक्तीला कोणता पोषक आहार द्यावा ज्यामुळे तो लवकर बरा होऊ शकतो, याचीही माहिती मिळते. शरीर संघटनची अवधारणा सिद्ध चिकित्सा प्रणालीमध्ये ‘मुथ थाडहू’ म्हणजे तीन जीवन कारक वाथम, पीथम आणि काबमवर आधारित आहे.

36 लोकांवर केले संशोधन
त्यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची स्थिती वेगळी असते आणि सर्वांमध्ये प्रतिकारशक्तीसुद्धा सारखी नसते. या पद्धतीचा वापर 36 लोकांवर करण्यात आला जे कोविड-19 संक्रमित व्यक्तीच्या अगोदरच्या संपर्कातील व्यक्ती होते आणि राज्यातील तीरुपट्टूरमध्ये विलगिकरणात होते. हे सर्व आरोग्य स्वयंसेवक होते आणि या पद्धतीचा वापर केल्यानंतर असे आढळले की, जे वाथम श्रेणीत आले त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी होती, जे प्रथम श्रेणीत आले त्यांच्यात मध्यम प्रतिकारशक्ती स्तर 75 टक्के होता आणि जे काबममध्ये होते त्यांच्यात 100 टक्के प्रतिकारशक्ती होती.

टीमने या पद्धतीचा वापर आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांवर केला, जेणेकरून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा कालावधी आणि कोरोना व्हायरसची तपासणी निगेटिव्ह येण्याचा कालावधीची माहिती मिळू शकते. टीमला आढळले की, वाथम श्रेणीमध्ये येणार्‍या लोकांना बरे होण्यास 7.5 दिवस, पीथममध्ये येणार्‍यांना एक आठवडा तर काबममध्ये येणारे सरासरी सहा दिवसात बरे झाले.