Corona Vaccination : सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे मागितला लसीकरणाचा संपूर्ण ‘लेखाजोखा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या Corona प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यातच देशात 1 मे पासून तिस-या टप्यात 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्र बंद आहेत. दरम्यान लसीकरणाच्याबाबतीत सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि. 2) मोदी सरकारला लस खरेदीची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

 
केंद्राने आजवर खरेदी केलेल्या कोरोना Corona प्रतिबंधक लसींची सर्व माहिती न्यायालयासमोर सादर करावी, अशा सूचना दिल्या आहेत. याकरिता केंद्राला 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. लसींची खरेदी सरकारने केंव्हा, कधी, किती केली याची लेखी माहितीच कोर्टाने मागवली आहे. तसेच देशात आतापर्यंत एकूण किती नागरिकांचे लसीकरण झाले याची देखील माहिती बंद लिफाफ्यात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune : चॅटींग अ‍ॅपद्वारे ओळख करुन तरुणाला लुटणारे अटकेत; कोंढवा पोलिसांची कामगिरी

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश एल. एन. राव आणि एस. रवींद्र भट्ट यांच्या विशेष खंडपीठाने हा आदेश दिला आहे. देशात आतापर्यंत किती जणांचे लसीकरण झाले. उर्वरित जनतेचे लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल? असा सवाल सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला आहे. तसेच देशात म्यूकरमायकोसिसच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधांच्या उपलब्धतेसाठी सरकारने नेमकी कोणती तयारी केली आहे? याचीही माहिती देण्यासही कोर्टाने सांगितले आहे.

न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, केंद्र सरकारने आजवर खरेदी केलेल्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक-व्ही लशींच्या खरेदीसाठी नेमक्या केंव्हा ऑर्डर दिल्या ? एकूण किती लस खरेदी केली, त्याचे वाटप कशापध्दतीने झाले याची स्पष्ट माहिती न्यायालयासमोर सादर करावी. तसेच आतापर्यंत देशातील एकूण जनतेपैकी किती टक्के जनतेला लसीचा पहिला अन् दुसरा डोस दिला आहे. यात ग्रामीण आणि शहरी भागातील प्रमाण किती? याचीही माहिती सरकारने सादर करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !