शेतकऱ्यांना तात्काळ निधी द्यावा – फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी द्यावा, अशा मागणीचे आश्वासन माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी दिले.

त्याचप्रमाणे मुख्य मंत्री सहाय्यता निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातून व्हावे, निधीचे वितरण होऊन लोकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली. दोन्ही मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या बैठकीत शेतकरी प्रश्नासाठी कृती करण्याचे ठरले. लगेचच फडणवीस यांनी राज्यपाल भेट घेतली, भाजपचे अन्य नेते शेती पहाणीसाठी दौरे करणार आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like