नववर्षात बदलणार PF चा ‘हा’ नियम, लाखो लोकांचा होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नव्या वर्षात एम्प्लॉयी प्रॉव्हीडंट फंडच्या निमयाम मोठा बदल होणार आहे. 1 जानेवारी 2020 पासून एम्प्लॉयी प्रॉव्हीडंट फंडचे नवीन नियम लागू होणार आहेत. ज्यांचा अद्याप पीएफ कापलेला नाही अशा जम्मू काश्मीरमधील कर्मचाऱ्यांना या नव्या नियमांचा फायदा होणार आहे.

कर्मचाऱ्यांची सोशल सिक्योरिटी पाहता EPFOनं हे पाऊल टाकलं आहे. सध्याच्या 6 कोटी सदस्यांव्यतिरीक्त जवळपास 50 लाख अतिरीक्त कर्मचाऱ्यांना सोशल सिक्योरिटीचा फायदा मिळणार आहे.

कुठे लागू होतो EPFचा नियम ?

नियमांनुसार, प्रॉव्हीडंट फंड तिथे लागू होतो जिथे कोणतीही संस्था, फर्म किंवा कार्यलायत 20 हून अधिक कर्मचारी असतात. EPF अधिनियमानुसार, अशा संस्थांना EPFचं सदस्यत्व दिलं जातं. आता केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना सोशल सिक्योरिटी देण्याच्या हेतूनं याची मर्यादा कमी करत 10 केली आहे. आता ज्या संस्थांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतील त्या संस्था EPFच्या अखत्यारित येतील.

EPFच्या अखत्यारित येण्यासाठी 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या संस्थांना एम्प्लॉयी प्रॉव्हीडंट फंट अँड मिसलेनियस प्रोव्हीजन अ‍ॅक्टनुसार, स्वत:ला रजिस्टर करणं गरजेचं आहे. सध्या त्याच संस्था याच्या अखत्यारित येतात ज्यांची कर्माचारी संख्या 20 हून अधिक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/