शिक्षकांच्या जुन, जुलै व ऑगस्टमधील पगारासाठी मोठी तरतुद, असे होणार 3 महिन्यांचे वेतन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक आणि शिक्षण कर्मचारी यांच्या वेतनाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर केल्या गेलेल्या तरतुदीनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यानचे वेतन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास मान्यता मिळाली आहे. यामध्ये २ हजार २७७ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये वितरित केले जातील.

पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संचालनालय स्तरावर झालेल्या तरतुदीनुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी जून, जुलै आणि ऑगस्टचे वेतन आणि भत्ते, निवृत्तीवेतन, उपदान यांचा खर्च भागवण्यासाठी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

यात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या नियमांनुसार चालवल्या जाणाऱ्या शाळा, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना साहाय्य यांच्यासाठी ६१ कोटी ६३ लाख ४ हजार ५२० रुपये आणि निवृत्तीवेतनासाठी १९ कोटी ३० लाख ५ हजार ९९५ रुपये वितरित करण्याची तरतूद आहे.

तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा, सहाय्यक अनुदान यासाठी १५ कोटी ७२ लाख दोन हजार ४४७ रुपये, तर सर्वसाधरण शिक्षण, प्राथमिक शिक्षण व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अस्थापना अनुदान व सहाय्यक अनुदानासाठी १ लाख ३९ हजार ७३९ रुपये देण्यात येणार आहेत. सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, निरिक्षण, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नियमानुसार सप्रयोजन अुनदान, प्राथमिक शाळांचे निरीक्षण, सहाय्यक अनुदान यासाठी ११ लाख २५ हजार २१३ रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. या वितरीत तरतुदीमध्ये कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही आणि हे वितरण संगणक वितरण प्रणालीनुसार शिक्षण आयुक्त यांच्या सांकेतांकावर करण्यात आले आहे.