सातार्‍यातून उदयनराजेंचा 2 लाखांनी पराभव होणार, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं केला दावा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा लोकसभा मतदारसंघातून चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यात आता भाजपाकडून छत्रपती उदयनराजे भोसले निवडणुक लढवत आहे.

या लढतीबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यंदा छत्रपती उदयनराजे भोसले यांचा २ लाख मतांनी पराभव होईल, असा दावा केला आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कऱ्हाडमध्ये येऊन शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या ७० वर्षात महाराष्ट्रासाठी काय केले याचा जाब विचारा, असे आवाहन केले होते. त्याला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, आपण ६ वर्षे केद्रात मंत्री होतो, त्यावेळी साताऱ्यात केंद्रीय भुकंप संशोधन केंद्र, केंद्रीय विद्यालय आणले. याची मतदारांना चांगली जाणीव आहे.

ज्यांना अर्थव्यवस्थेचे अ ब क माहिती नाही, अशी लोक अर्थव्यवस्थेवर बोलत आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी यापूर्वी ओला, उबेरमुळे लोक गाड्या खरेदी करीत नसल्याचे बोलल्या होत्या. आता प्रसाद सिनेमाची किती तिकीटे खपली यावरुन अर्थव्यवस्थाचे मोजमाप करीत आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग शुन्य टक्क्यांवर आल्यावर तुम्ही जागे होणार का असे त्यांनी सांगितले.

सातारा हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे चार महिन्यात ज्यांना निवडून दिले. त्यांनी पक्ष बदलल्याने मतदार नाराज आहेत. यंदा उदयनराजे यांचा २ लाख मतांनी पराभव होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like