मुख्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी PSIसह हेडकॉन्स्टेबलची शिक्षा कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालायने पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्सटेबलला ५ वर्षे सक्तमजूरी आणि १ हजार रुपेय दंडाची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा पुणे सत्र न्यायालायने कायम ठेवली आहे.

पोलीस हेडक़ॉन्सटेबल नानासाहेब भीमराव साळुंके (वय ४७, रा. खडक पोलीस वसाहत, पुणे) व पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र तात्याबा घुले (वय ५८, रा. हडपसर) या दोघांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. देवीदास सुर्यभान पुंजरवाड याने शिवाजीनगर मुख्यालयातील पोलीस मैदानात असलेल्या वडाच्या झालाला साडीने गळफास घेऊन ४ सप्टेबर २०१२ रोजी आत्महत्या केली होती.

देवीदास पुंजरवाड हा पुणे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाला होता. त्याचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात त्याचे प्रशिक्षण सुरु होते. त्यावेळी हेडकॉन्सटेबल नाना साळुंके हे त्यांचे ड्रील मास्तर व हजेरी मास्तर होते. तर पोलीस उपनिरीक्षक घुले हे त्यांना प्रशिक्षण देणारे इन्चार्ज होते. दरम्यान पोलीस प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेला देवीदास हा प्रशिक्षण कालावधीत ५ दिवस गैरहजर होता. त्यामुळे त्याला हजर करून घेण्यासाठी साळुंके यांनी त्याला ५ हजार रुपये तर घुले यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याला वेळोवेली पैशांची मागणी करून त्याला त्रास दिला. त्यानंतर त्यांच्या त्रासाला कंटाळून देवीदास याने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील परेड ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर २०१४ मध्ये न्यायालयाने या दोघांना ५ वर्षे सक्तमजूरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सत्र न्यायालयात आज यासंदर्भात सुनावणी झाली. त्यावेळी सरकारतर्फे एड, सुनील मोरे यांनी बाजू मांडली. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने दोघांची शिक्षा कायम ठेवली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like