आरोपीचा वाढदिवस सेलिब्रेट करणारे ‘त्या’ पोलिस ठाण्यातील २ पोलिस उपनिरीक्षक, २ हवालदार तडकाफडकी निलंबीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भांडुप पोलीस ठाण्यात आरोपी आयान खानचा वाढदिवस साजरा करणे २ पोलीस उपनिरीक्षक आणि २ हवालदारांचा चांगलाच महागात पडला आहे. वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी त्यांना निलंबित केले आहे. भांडुप पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सचिन कोकरे, उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पोलिस हवालदार घोसाळकर, पोलिस कर्मचारी गायकवाड आणि जुमले अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावेत आहेत.

आयान खान हा पोलिसांचा खबरी आहे. त्याचा २३ जुलैला वाढदिवस होता. भांडुप पोलीस ठाण्याच्या इमारतीत एका कक्षात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी आयानला केक भरवताना स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओची दखल घेऊन पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी चौकशी केली. त्यानंतर अखेर ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आयान खान याच्यावर २०१० मध्ये मारामारी आणि अपहरण या सारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अपहरणाच्या गुन्ह्यातून त्यांचे नाव कमी केले तर दुसऱ्यां गुन्ह्यात त्याचा समावेश नसल्यामुळे न्यायालयात बी समरी फाईल करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय