सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – PSI Death Due To Heart Attack | सोलापूर जिल्हा पोलिस दलातील (Solapur Rural Police) एका पोलिस उपनिरीक्षकाचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुट्टीसाठी मामाच्या घरी गेल्यानंतर पीएसआयला हार्टअटॅक आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.
युवराज कृष्णा भालेराव PSI Yuvraj Bhalerao (56) असे त्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. भालेराव हे सोलापूर जिल्हा पोलिस दलाच्या पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती पोलिस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत होते. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ मध्ये भालेराव यांची प्राणज्योत मालवली. भालेराव यांच्या दुर्देवी मृत्यूने पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
पंढरपूर येथील संत निरंकाही मठ, सांगोला रोड येथे भालेराव हे रहावयास होते. 2 दिवस सुट्टीसाठी ते मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे मामाच्या घरी राहण्यासाठी गेले होते. दि. 23 (शुक्रवारी) रोजी त्यांना अचानकपणे चक्कर आली. ते खाली पडले. त्यांना त्वरीत पुढील उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. (PSI Death Due To Heart Attack)
भालेराव हे पोलिस दलाअंतर्गत नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये पीएसआय झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 अविवाहीत मुले असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस हवालदार सचिन मुसळे हे अधिक तपास करीत आहेत. भालेराव यांच्या निधनाने पोलिस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title :-PSI Death Due To Heart Attack | Sad News ! Police sub-inspector PSI Yuvraj Bhalerao dies of massive heart attack Solapur Pandharpur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Deepak Kesarkar | संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य