PSI Death-Heart Attack | मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – PSI Death-Heart Attack | जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. यातच मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे जालना पोलीस दलात (Jalna Police) हळहळ व्यक्त होत आहे. (PSI Death-Heart Attack)

 

पोलीस उपनिरक्षक सय्यद अहमद सय्यद जमील (वय-55) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. जलील हे जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. आज सकाळी रेल्वे मैदानावर मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. जमील हे पोलीस दलात मामु या नावाने परिचीत होते.

 

सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना जलील यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जलील हे परतूर तालुक्यातील रेवलगाव या ठिकाणचे रहिवासी होते.
त्यांच्यावर मूळ गावी अंत्यविधी केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

 

Web Title :- PSI Death-Heart Attack | heart attack during morning walk death of sub inspector of police jalna crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांच्या पोस्टने वेधले लक्ष ; “एका जन्मात अनेक जन्म……

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या