‘जनावर’ परत मिळवून दिल्याबद्दल १५ हजारांची लाच घेणारा PSI अटकेत

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

 

चोरीला गेलेली जनावर परत मिळवून दिल्याबद्दल १५ हजारांची लाच घेताना एका पोलीस उप निरीक्षकास (PSI) अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सातारा अॅन्टी करप्शनच्या पथकाने  आज (सोमवार) औंध पोलीस ठाण्याच्या पुसेसावळी दुरक्षेत्र चौकीत केली. श्रीकांत विष्णुपंत देव (वय- ५५) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b397c93-ba8c-11e8-816c-33ab8287aeba’]

तक्रारदार यांची म्हैस काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याची फिर्य़ाद तक्रारदाने औंध पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन तक्रारदाराची म्हैस परत मिळवून दिली होती. चोरीला गेलेली म्हैस परत मिळून दिल्याबद्दल श्रीकांत देव याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागा सातारा यांच्येकडे केली. पथकाने आज पुसेसावळी दुरक्षेत्र चौकीत सापळा रचून देव याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडेले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ही कारवाई लाचलुचपत प्रिबंधक विभाग साताराचे पोलीस उप उपअधिक्षक अशोक शिर्के यांच्या पथकाने केली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्य़ालयात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप उपअधिक्षक अशोक शिर्के लाचलुचपत प्रिबंधक विभाग सातारा यांनी केले आहे.