भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा रोडवरील बालाजीनगर येथील पुलावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे जखमी झाले. शिंदे हे गुन्हे शाखेच्या युनिट २ मध्ये नियुक्तीला आहेत.
बालाजीनगर येथील बीआरटी मार्गावरील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला.

या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. अपघातानंतर ते जागीच बेशुद्ध झाले होते. नागरिकांनी त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर ते शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. डॅपरचालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

ट्रक कात्रजकडून स्वारगेटकडे जात होता. तर नितीन शिंदे हे आपले काम संपवून आंबेगाव खुर्द येथील घरी जात होते. उड्डाणपुलावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल. ट्रक दुभाजकावरुन समोरच्या लेनमध्ये गेला व त्याने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/