PSI Ramrao Patil Death In Accident | दुर्देवी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा (PSI) उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – PSI Ramrao Patil Death In Accident | नाकाबंदी वेळी कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे शुक्रवारी (दि. 29) उपचारादरम्यान निधन झाले (PSI Death During Nakabandi). रामराव गोविंदराव पाटील (वय-55 रा. डोंगरसोनी ता. तासगाव) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रामराव पाटील हे श्रेणी उपनिरीक्षक होते. ही घटना मिरज तालुक्यातील अंकली येथे 15 दिवसांपूर्वी घडली होती. (PSI Ramrao Patil Death In Accident)

14 स्पटेंबर रोजी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अंकली फाटा येथे नाकाबंदी केली होती. त्यावेळी रामराव पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी हे वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजकडून एक कार (एमएच 47 बीजे 4693) भरधाव वेगात आली. पोलिसांनी कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्यातच या चौकामध्ये असलेले वळण कार चालकाच्या लक्षात आले नाही. त्याने रस्त्यावर उभा असलेल्या रामराव पाटील यांना जोरात धडक दिली. (PSI Ramrao Patil Death In Accident)

या धडकेत पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना नाकाबंदीवर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने एका
खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले.
रामराव पाटील यांच्यावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune Crime News | सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉय विजय ढुमेचा कोयत्याने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का! राज्यातील मंत्र्याच्या भावानं स्टेटसवर ठेवलं ‘मशाल’ चिन्ह

Sachin Waze | खंडणी प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर