PSI Suspended | पुण्यातील हॉटेलमध्ये पैसे मागणे पडले महागात, पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  यापुर्वी एकदा लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे (PSI Milan Kurkute) निलंबित (PSI Suspended) करण्यात आले होते. निलंबनाच्या (PSI Suspended) कारवाईनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. सध्या कुरकुटे हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Commissionerate) नियंत्रण कक्षात सलग्न (Control Room) होते. मध्यंतरी ते आजारपणाच्या रजेवर गेले होते. रजेवर असताना कुरकुटे यांनी पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या (mundhwa Police Station) हद्दीतील एका हॉटेल व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केली होती. यासंदर्भात मुंढवा पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना (Pimpri Chinchwad Police Commissioner) कळवल्यावर मिलन कुरकुटे यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station)
असताना जानेवारी 2020 मध्ये एका प्रकरणात लाचेची (Bribe) मागणी केली होती.
त्यांना वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad police station) हद्दीत लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई (Sandeep Bishnoi) यांनी कुरकुटे यांना निलंबित केले.
यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा पोलीस सेवेत घेऊन नियंत्रण कक्षाशी संलग्न केले होते.

 

कुरकुटे हे आजारपणाच्या रजेवर असताना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कार्निव्हल
(Hotel Carnival) येथे गणवेशात जाऊन हॉटेल मालकाला व मॅनेजरसोबत हुज्जत घालून पैशांची
मागणी केली. यासंदर्भात मुंढवा पोलिसांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांना कळवण्यात आले होते.
पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी मिलन कुरकुटे याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

 

Web Title : PSI Suspended | pimpri chinchwad control room police sub inspector milan kurkute suspended mundhwa police station matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Kisan | तुम्ही सुद्धा केले नसेल PM Kisan साठी रजिस्ट्रेशन तर तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा 6000 रुपयांचे होईल नुकसान; जाणून घ्या

Municipal Corporation Election | निवडणूक आयोगाकडून राज्यातील 18 महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश

Pune Crime | दागिने बनविण्यासाठी दिलेले 25 लाखाचे सोने घेऊन कारागीर पसार