गुहुंजे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) तडकाफडकी निलंबित

पुणे/तळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधांबाबत विचारपुस करायला गेलेल्या अक्षय दीपक यादव या तरुणाचा गहुंजे येथे खून करण्यात आला होता. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने केल्यानंतर हा अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक वैभव हणुमंत सोनवणे याला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.

पोलीस उप निरीक्षक वैभव सोनवणे याने खूनचा प्रकार दाबण्यासाठी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती. खून झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेत वैभव सोनवणे यांनी हालगर्जीपणा केल्याचे समोर आले होते. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल आल्यानंतर वैभव सोनवणे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. वैभव सोनवणे यांच्यावर तपासाची दिशाभूल करून गंभीर गुन्हा अपघात असल्याचे भासवल्याप्रकरणी निलंबीत करण्यात आले.

पत्नीचे किरण याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अक्षय यांना होता. त्याबाबत अक्षय आरोपी किरण बोडके याला विचारणा करण्यासाठी गहूंजे येथे गेला असता वादवादीतून भांडणे झाली. त्यावेळी अक्षयला दगडाने व लाथा बुक्क्यांने मारहाण करुन गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान अक्षयचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता. हे प्रकरण दाबण्यासाठी वैभव सोनवणे याने अक्षय याचा मृत्यू मोटारसायकवरून पडून झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार तळेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like