सोरायसिसच्या रुग्णांनी ‘अशी’ घ्यावी केसांची खास काळजी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजची जीवनशैली, विविध प्रकारचं प्रदूषण यांमुळं आपल्या त्वचा आणि केसांवर खूप परिणाम होताना दिसतो. यासाठी अनेकजण योग्य ती काळजी घेत असतात. अशात सोरायसिस असणाऱ्या व्यक्तींना तर जास्त काळजी घ्यावी लागते. अशा व्यक्तींनी कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी याची माहिती आज आपण घेणार आहोत.

1) केस हलक्या हातानं विंचरा. त्यावर जास्त ताण देऊ नका.

2) केसांसाठी बाजारात असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मर्यादित वापर करा. त्यामुळं केसगळतीची जास्त शक्यता असते.

3) कोणतीही हेअरस्टाईल करताना योग्य कॉस्मेटीक्सचा वापर करा.

4) हेअर कलर करण्यापू्र्वी दोन दिवस आधी आणि कलर केल्यानंतर दोन दिवस शॅम्पूचा वापर करू नका.

5) केसांच्या मुळाशी तेलानं हलक्या हातानं मालिश करा.

6) संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य द्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.