सोरायटिक संधीवात म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’ आणि ‘उपाय’ ?

पोलिसनामा ऑनलाईन – अनेकांना सोरायसिस हा त्वचाविकार असतो. या विकारात रक्तातील पांढऱ्या पेशींपैकी टी लिम्फोसाईटमध्ये काही बदल होतात. ज्यामुळं त्वचेच्या अस्तरातील पेशींवर परिणाम होतो आणि त्वचेवर एक जाडसर स्तर निर्माण होतो. यातलाच एक त्रासदायक प्रकार आहे तो म्हणजे सोरायटिक संधीवात ( psoriatic arthritis ). याला सोरायटिक आर्थ्रायटिस (पीएसए) ( psoriatic arthritis ) असंही म्हणतात. यात सांध्यांमध्ये दाह होऊन प्रचंड वेदना होतात.

सोरायटिक आर्थ्रायटिसची लक्षणं –

1) सुजलेले किंवा ताठर सांधे
2) स्नायूंमध्ये वेदना होणं
3) होताचं बोट, पायाचं बोट, मनगट, टाच किंवा कोपर यांत वेदना

उपचार पद्धती –

1) योग्य जीवनशैली आणि संतुलित आहार
2) नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे.
3) आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश
4) गोड पदार्थ, मीठ, मेद वाढवणारे पदार्थ टाळावेत.
5) मानसिकरित्या स्ट्राँग रहावं.

कसं केलं जातं या आजाराचं निदान ?

– सांध्याच्या समस्या किंवा ताठरतेच्या लक्षणांवर आधारीत काही चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
– संधीवाताचा प्रकार ओळखण्यासाठी काही सामान्य चाचण्या केल्या जातात. जसे की, एक्स रे आणि रक्त तपासणी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.