जम्मू-काश्मीरमध्ये मशिदींचा फायदा घेतायेत दहशतवादी, एका महिन्यातील दुसरी घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आता हल्ल्यांसाठी मशिदींचा आसरा घेत आहेत. एका महिन्यात दुसऱ्यांदा मशिदीत लपून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आजही दहशतवाद्यांनी सोपोरमधील मशिदीचा आसरा घेत सीआरपीएफ दलावर गोळीबार केला. या गोळीबारात एक सैनिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

मशिदीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवानही जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या आयजी कुमार यांनी सांगितले की, मृत्यू झालेला नागरिक आपल्या मुलाला गाडीत घेऊन चालला होता, घाबरून तो मुलासह पळू लागला त्यावेळी गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.

२०१९ मध्ये (जानेवारी-जून) मध्ये सुमारे १२९ नवीन युवक सैन्यात दाखल झाले आहेत. यावर्षी ६ महिन्यात ६७ जण सामील झाले. त्या ६७ जणांपैकी २४ जण चकमकीत मारले गेले, १२ जणांना अटक करण्यात आले आणि बाकीचे फिल्डवर आहेत. विजय कुमार म्हणाले की, गेल्या एका महिन्यात अशा दोन घटना घडल्या आहेत, ज्यात दहशतवाद्यांनी आपल्या मशिदींचा दुरुपयोग केला आहे. दहशतवाद्यांना धार्मिक स्थळे वापरू देऊ नये, अशी मी मशिद समितीला विनंती करतो.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ बुधवारी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला घुसखोरीचा प्रयत्न करत असताना ठार केले. सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राजौरीच्या केरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेपासून ४०० मीटर अंतरावर आलेल्या एका गटाला पहाटे ५.५५ वाजता सैनिकांनी थांबवले आणि त्यानंतर तेथे गोळीबार सुरू झाला. त्यांनी सांगितले की, गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडून एक एके४७ आणि दोन मासिके जप्त करण्यात आली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like