खुशखबर ! आजपासून बँका ग्राहकांना देणार 59 मिनिटात ‘गृह’ आणि ‘वाहन’ कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून (1 सप्टेंबर 2019) बँकेशी संबंधित बरेच नियम बदलणार आहे. ज्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होईल. बँक अनेक कर्ज स्वस्त करणार आहेत, यानंतर बँका आता ग्राहकांना कमी वेळात कर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्हाला फक्त 59 मिनिटात गृह कर्ज, वाहन कर्ज मिळेल.

59 मिनिटात मिळणार गृह कर्ज, वाहन कर्ज –
सणासुदींचा विचार करता सरकार बँकांमधून फक्त 59 मिनिटात गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहेत. अनेक सरकारी बँका 1 सप्टेंबर पासून ग्राहकांना नव्या सुविधा देणार आहे. ओरिएंटल बॅक ऑफ कॉमर्सने देखील psbloanin59minutes वर ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकार देशातील छोट्या उद्योजकांना कर्ज देत आहे. सरकारने MSME साठी PSB Loan in ५९ Minutes सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत MSME साठी १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज फक्त ५९ मिनिटात मिळू शकत होते. आता या सुविधेअंतर्गत कर्जाची रक्कम वाढून ५ कोटी रुपये करण्यात आली. आता फक्त ५९ मिनिटात MSME ला ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची रक्कम ८ दिवसात तुमच्या खात्यात जमा होईल.

५९ मिनिटात ५ कोटी रुपयांचे कर्ज –
PSB Loans in ५९ Minutes अंतर्गत पार्टनर बँकांनी म्हणजे SBI, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँकने कर्जाची मर्यादा ५ कोटी रुपयांपर्यंत केली आहे. या कर्ज सुविधेत काही नव्या सुविधा देण्यात येणार आहेत, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. कॉन्टॅक्टलेस व्यवसाय कर्जाची सुरुवात १ लाख रुपयाने होते आणि ५ कोटी रुपयांपर्यंत आहे. यावर व्याज ८.५ टक्कांपासून सुरु होते.

असे मिळवा कर्ज –
कर्ज घेण्यासाठी अप्लाय करायचे असल्यास MSME ला https://www.psbloansin59minutes.com/signup वर जावे लागेल, यात अर्ज करणाऱ्याला आपले नाव, ई मेल आयडी, फोन नंबर भरावा लागेल, यानंतर OTP टाकून पुढील प्रक्रिया सुरु होईल.

आरोग्यविषयक वृत्त –