मानसोपचार तज्ज्ञाकडून रुग्णावर ‘बलात्कार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेण्यासाठी आलेल्या एका रुग्णावर दोन वर्षांपूर्वी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात या मानसोपचार तज्ज्ञाविरोधात बलात्काराचा गुन्हा आणि अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची आता कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मानसोपचार तज्ज्ञाचं संजोय मुकेरजी असं नाव आहे. २०१८ मध्ये या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. हि सर्व माहिती तरुणीने तिच्या पालकांना या आठवड्यात दिली त्यानंतर पोलिसानी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हि तरुणी २०१८ मध्ये मानसिक आजाराने त्रस्त होती. तेव्हा तिला तिच्या कुटूंबियांनी डॉक्टर कडे घेऊन गेले नंतर तिला रक्ताची चाचणी करण्यास सांगितली. तिला मानसिक त्रास सांगून डॉक्टरने मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचा सल्ला दिला. त्या तरुणीने ती राहत असलेल्या परिसरातील चांगल्या डॉक्टरांचा ऑनलाइनवरून शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला मुकेरजींचा दवाखाना सापडला ऑगस्ट २०१८ मध्ये ती तरुणी वडिलांना घेऊन मुकेरजींच्या दवाखान्यात गेली. पहिल्या सेशननंतर मुकेरजींनी तिला पुढील आठवड्यात येण्यास सांगितले. नंतर ती आजोबाला घेऊन आली. मुकेरजीने उपचाराच्या नावाखाली आजोबांना बाहेरच बसण्यास सांगितलं. त्यानंतर तिला टॉमबॉय सारखे कपडे घालण्यास दिले. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले तिला संजोय मुकेरजी यांनी घट्ट मिठी मारली होती.

या प्रकारानंतर या तरुणीने दुसऱ्या सेशनला जाण्यास नकार दिला. मात्र तिच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने सेशनला पाठवले. या तरुणीच्या तक्रारीनुसार दुसऱ्या सेशनला या मुकेरजीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची व्हिडिओ क्लिपसुद्धा काढली. त्यानंतर या तरुणीने मुकेरजीकडे पुन्हा जाऊन ती क्लिप डिलिट करण्यास सांगितले असता त्याने पुन्हा तिच्याशी अनैसर्गिक सेक्स केला. त्यानंतर ती परत मुकेरजीकडे गेली नाही. तिने एका महिला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना या तरुणीने झालेला सर्व प्रकार महिला मानसोपचार तज्ज्ञाला सांगितला. त्यावर तिने या तरुणीला सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगण्यास सांगितले आणि त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी मुकेरजीला अटक करण्यात आली. लॅबमध्ये मुकेरजीच्या फोनची तपासणी होणार आहे. ही तरुणी आपल्याला आवडत असल्याचं मुकेरजीने पोलीस तपासात सांगितल्याचं समोर आलं आहे.

हा प्रकार घडल्या नंतर तरुणीने दुसऱ्या सेशन ला जाण्यास नकार दिला. मात्र सेशनला तिच्या घरच्यांनी तिला जबरदस्तीने पाठवले. दुसऱ्या सेशन ला त्या तरुणीवर बलात्कार केला आणि तिची व्हिडिओ क्लिपसुद्धा काढली. नंतर त्या तरुणीने ती क्लीप डिलिट करण्यासाठी सांगितले असता मानसोपचार तज्ज्ञाचं संजोय मुकेरजी यांनी पुन्हा तिच्याशी अनैसर्गिक सेक्स केला. नंतर ती केव्हा मुकेरजीकडे गेली नाही. तिने नंतर महिला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार चालू केले. महिला मानसोपचार तज्ज्ञाला उपचार सुरू असताना या तरुणीने झालेला सर्व प्रकार सांगितला. महिला मानसोपचार तज्ज्ञाने सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगण्यास सांगितले. आणि ११ फेब्रुवारी ला मानसोपचार तज्ज्ञाचं संजोय मुकेरजी याना अटक करण्यात आली. लॅबमध्ये मुकेरजीच्या फोनची तपासणी होणार आहे. पोलीस तपास सुरु असताना मुकेरजी याना ती तरुणी आवडत असल्याच सांगितलेल समोर आलं आहे.

You might also like