खळबळजनक ! ‘या’ राज्याच्या राजधानीत PTI च्या ब्युरो चीफनं केली आत्महत्या

रांची : वृत्तसंस्था – झारखंडची राजधानी रांची येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका ज्येष्ठ पत्रकाराने आत्महत्या केली आहे. या पत्रकाराचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी सापडल्याचे सांगितले जात आहे. पीटीआय ब्यूरोचे प्रमुख पीव्ही रामानुजम यांनी त्यांच्या घरी आत्महत्या केली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्यांचे कार्यालय त्यांच्या निवासस्थानीच आहे आणि तेथेच त्यांचा मृतदेह आढळला आहे. आपल्या घरातील कार्यालयात रामानुजम यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

ज्येष्ठ पत्रकाराने केली आत्महत्या
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया रांचीचे ब्यूरो चीफ पीव्ही रामानुजम यांनी गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लालपूर पोलिस स्टेशन परिसरातील गृहनिर्माण-कार्यालयात राहणारे पीव्ही रामानुजम यांनी रात्री उशीरा आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून त्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवला जाईल.

आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही
पत्रकाराने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. पोलिस मृताच्या पत्नीचे निवेदन घेतील. घटनेची माहिती मिळताच मृताचा एकुलता एक मुलगा ओडिसाहून रांची येथे येत आहे. पीटीआयचे पत्रकार पी.व्ही. रामानुजन हे जवळजवळ दोन दशकापासून रांची येथे काम करत होते आणि ते रांचीतील राजभवनाजवळील सरकारी क्वार्टरमध्ये आपल्या पत्नीसमवेत राहत होते. याच इमारतीत रांची येथील पीटीआय कार्यालय चालत होते. या घटनेनंतर त्यांना ओळखत असलेल्या प्रत्येकाला धक्का बसला आहे आणि मीडियामध्ये शोकाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केले दुःख
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले की, ‘पीव्ही रामानुजम यांचे निधन हे पत्रकारितेचे न भरले जाणारे नुकसान आहे. त्यांच्या पत्रकारितेने बर्‍याच पत्रकारांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांना ही दु:खाची वेळ सहन करण्याची शक्ती देईल.’ केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सह मंत्री डॉ. रामेश्वर उरावन, प्रदेश भाजप अध्यक्ष दीपक प्रकाश यांच्यासह इतर लोकांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त व्यक्त केले आहे.