पाकिस्तानी PM इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्याने हिंदूंची मागितली माफी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ म्हणजेच पीटीआयचे नॅशनल असेंब्लीचे सदस्य अमीर लियाकत हुसेन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंदू देवीचे चित्र वापरल्यामुळे हा वाद ओढवला आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे उपाध्यक्ष मेरीम नवाज यांची खिल्ली उडवण्यासाठी आमिर लियाकत यांनी हिंदू देवी कालिका माताचे चित्र पोस्ट केले होते.

वास्तविक, आमिरने न्यूज चॅनलचा एक स्क्रीनशॉट शेअर केला होता, त्यात मरियमचे विधान लिहिले गेले होते. मरियमने लिहिले होते कि, आता इम्रान खान त्यांचे दुसरे रूप पाहतील. या विधानासह लियाकतने कालिका देवीचा फोटो लावला होता. या पोस्टमुळे पाकिस्तानमध्येच आमिरवर कडक टीका झाली. तिथल्या हिंदू आणि मुस्लिमांनीही आमिरवर जोरदार टीका केली आणि ट्विट डिलीट करून माफी मागण्यास सांगितले.

यानंतर वाढता वाद पाहता आमिरने बुधवारी रात्री ट्विट करुन माफी मागितली. आपल्या ट्विटमध्ये आमिरने लिहिले की, “हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा अजिबात असा हेतू नव्हता. मी ते ट्विट डिलीट केले. मी सर्व धर्मांचा आदर करतो. इस्लाममध्ये आपल्याला हीच शिकवण मिळते. दरम्यान, आमिर लियाकत वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही तो वादात अडकला होता.

उमरकोट येथील पीटीआयच्या राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य ला मल्ही यांनी ट्विट केले की, ‘आम्ही या निंदनीय कृत्याचा तीव्र निषेध करतो. मी इम्रान खान यांना अपील करतो कि, आमिर लियाकत हुसेन यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. इस्लामसह कोणत्याही धर्मात याची परवानगी नाही. पाकिस्तान हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. रमेशकुमार वंकवाणी यांनी देखील आमिर लियाकत हुसेन यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विट करत लिहिले कि, “या लज्जास्पद कृत्यावर मी टीका करतो. ते स्वत: ला धार्मिक विद्वान म्हणतात पण इतर धर्मांचा आदर कसा करावा हे त्यांना माहित नाही. तुम्ही हे ट्विट डिलीट करा किंवा निंदनीय कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करून देशव्यापी निषेध करण्याचा आमचाही अधिकार आहे. ”रमेश कुमार देखील पीटीआयचे नेते आहेत.

पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनीही ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन आमिर लियाकतचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “आमिर लियाकत साहेब यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंदू देवीचा फोटो लावला आहे. रियम नवाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते कि, इम्रान खान यांना आता त्यांचे आणखी एक रूप पाहायला मिळेल. आमिर लियाकत साहब यांनी त्या विधानावर हिंदू देवीचा फोटो लावला आहे. त्यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ” ते म्हणाले, “ही पहिलीच घटना नाही. पीटीआय नेते आधीपासूनच हे करत आहेत. यापूर्वी फयाझुल चौहान यांनी असे केले होते. पीटीआय नेते अश्या प्रकारचे का वागतात. हे सर्व हिंदूविरोधी द्वेष का पसरवित आहेत? “इम्रान खान यांनी या देशात 50 लाख हिंदू आहेत याची काळजी घ्यायला हवी.”