पबजी खेळताना आईने मोबाईल हिसकावला , १४ वर्षीय मुलाने प्यायले वीष

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – आईने पबजी खेळताना मोबाईल काढून घेतल्याने १४ वर्षीय मुलाने रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . नाशिक जिल्ह्यातील सातपुरा येथे शिवाजीनगरमध्ये ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

आकाश महेंद्र ओस्तवाल (१४, शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

आकाश ओस्तवाल शुक्रवारी सायंकाळी आईच्या मोबाईलमध्ये पबजी गेम खेळत होता . त्याची बहिण हॉस्टेलमध्ये राहते . तिचा फोन आला . त्यामुळे आईने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला . त्याच्या लेव्हल अपुर्ण ऱाहिल्या. याचा राग त्याला आला .  त्यामुळे तो घरातून बाहेर पडला आणि विषारी औषध आणून ते प्राशन केले . आकाशला उलट्यांचा त्रास होऊ लागला . त्यानंतर तो बेशुद्ध पडला . त्याला शिवाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्याची प्रकृती चिंताजनक आहे.