पुणे : PUBG खेळून तरुणाचं डोकं ‘फिरलं’, घटनेपेक्षा युवकाचं नाव चर्चेत !

पुणे (चाकण) : पोलीसनामा ऑनलाइन – PUBG या गेमचं तरुणाईला वेड लागलं आहे. या खेळामुळे अनेक घटना घडल्या आहेत. तसेच या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे आपण ऐकले असेल. मात्र पुणे जिल्ह्यातील चाकण येथे एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्याचे मानसिक स्वास्थ बिघडल्याने त्याने गोंधळ घातला. अखेर नागरिकांनी या तरुणाला पकडून चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची चर्चा परिसरात सुरु झाली. मात्र त्याच्या अशा वागण्यामुळे तो चर्चेत आला नाही तर त्याच्या नावामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

मानसिक स्वास्थ बिघडलेल्या तरुणाचे नाव अजित शिवाजी पवार असून तो उच्चशिक्षीत आहे. अजित हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावचा रहिवाशी आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची तयारी दाखवली आहे. सोमवारी सकाळी या महाशयांना पब्जी गेममध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने गेममध्ये दिल्या जाणाऱ्या कमेंट्सचा वापर तरुणाने आपल्या सामान्य आयुष्यात केला. आज या तरूणाने चाकणच्या रस्त्यावर जाऊन पब्जी गेममध्ये येणारे कमेंट्स नागरिकांना उद्देशून वापरल्या.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, त्याने स्वत: मोबाईल दगडाने फोडला. मित्रांना भेटून म्हणाला, मला दोनशे माणसे मारायला आली आहेत. तो रस्त्यांवर मुलांच्या सायकलीवर बसायचा आणि त्यांना त्रास देत होता. एका मिनिटांत अख्खी बिल्डिंग उडवून टाकतो, असे तो म्हणत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच तो पबजी मध्ये असलेल्या अ‍ॅक्शन करत गावात फिरत होता. लोकांना दगडं मारत होता. यानंतर घटनेची माहिती चाकण पोलिसांना देण्यात आली.

बिबवेवाडीत पबजीच्या आहारी गेलेल्या 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
बिबवेवाडी परिसरात एका सोळा वर्षांच्या मुलाने मोबाइलमध्ये व्हिडिओ रिकोर्डिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजीनं पबजी व टिक टॉक व्हिडिओ पाहण्यास विरोध केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.2) सायंकाळी घडला.

Visit : policenama.com