PUBG Mobile नं आणलं 1.3 व्हर्जन; जाणून घ्या काय आहे खास ‘या’ खेळात?

पोलिसनामा ऑनलाईन : जगात PUBG Mobile चे लाखो युझर्स आहेत. म्हणून आता या लाखो युझर्ससाठी अर्थात वापरकर्त्यांसाठी PUBG Mobile 1.3 व्हर्जन आणले आहे. 1.3 ग्लोबल व्हर्जन रिलीज केले आहे. PUBG Mobile 1.3 ने आपल्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन अपडेट आणले आहे. यात Hundred Rhythms मोड सहित Clowns Tricks मिनी गेम आणि Mosin-Nagant 7.62mm बोल्ट अ‍ॅक्शन स्नाइपर रायफल आणि ग्लाइडर व्हाइकल सादर केलं आहे.

जाणून घ्या, काय आहे विशेष या PUBG Mobile 1.3 व्हर्जनमध्ये :
PUBG Mobile 1.3 ने आपल्या नवीन अपडेटमध्ये नवीन मोड, शस्त्रे, मिनी गेम्स आणि वाहने जोडली आहेत. PUBG Mobile 1.3 पॅच नोट्सनुसार हंड्रेड रिदम आणि क्लाउन ट्रिक्स (Hundred Rhythms आणि Clowns Tricks) मोड देखील यात जोडला गेला आहे. अहवालानुसार, हा मोड क्लाउन टोकनऐवजी कित्येक स्ट्रॅटजीक आयट्म्स घेण्यास खेळाडूंना मदत करेल.

PUBG Mobile 1.3 व्हर्जन खेळताना मिळेल ही रायफल :
Mosin-Nagant 7.62mm बोल्ट अ‍ॅक्शन स्नाइपर रायफल देखील PUBG Mobile 1.3 व्हर्जनमध्ये केली गेली आहे. नवीन स्नाइपर रायफल Kar98 प्रमाणेच असेल. ही रायफल फक्त एरेंजेल आणि विकेंडी (Erangel आणि Vikendi) नकाशे मध्ये दिली जात आहे. तसेच, दोन सीटर (Motor Glider) मोटर ग्लाइडर देखील गेममध्ये जोडला गेला आहे. यात चालविणारा सोडून इतर खेळाडूला गोळीबार करता येईल.