भारतात लवकरच परत येऊ शकतो PUBG ! चीनशी सगळे संबंध तोडण्याच्या तयारीत कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने मागील आठवड्यात चीनच्या 118 अँप्सवर बंदी घातली. त्यामध्ये PUBG चा देखील समावेश आहे. या बंदीमुळे गेमिंग कम्युनिटी परेशान आहे, पण एक दिलासादायक बातमी आहे. PUBG कॉर्प नुसार ही पूर्ण परिस्थिती अवगत आहे आणि प्रतिबंधाच्या मुद्द्यावर विचार सुरू आहे.

सोबतच हे देखील कन्फर्म झालं आहे की PUBG मोबाईलवर Recent Games ला संपवलं जाईल, आणि याची सर्व जबाबदारी PUBG कॉर्प कडे येणार आहे. ओरिजनल साऊथ कोरिया बेस्ड गेमिंग कंपनी याची जबाबदारी संबळणार आहे. आणि असं झालं तर लवकरच PUBG वरील बंदी हटवण्यात येईल.

रिपोर्टनुसार भारतात 118 अँप्सवर बंदी घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेंसेन्ट कंपनीला 34 बिलियन डॉलरचं नुकसान झालं होतं.

PUBG Corporationने सांगितलं की, PUBG Corporation सरकारने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करतो, कारण प्लेयर डेटाची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी कंपनीसाठी महत्वाची आहे.

हा ग्रुप भारत सरकारसोबत असं काम करण्याची अपेक्षा करतो जेणेकरून गेमर्स पुन्हा एकदा भारतीय कायदे जाणून घेऊन युद्धाच्या मैदानात उतरू शकतील. सध्याच्या घटनांकडे पाहता, PUBG Corporationने भारतात टांसेन्ट गेम्स साठी PUBG मोबाईल फ्रेचाईजीला ओथोराईज न करण्याचा निर्णय घेतला आहे.

PUBG Corporation देशातील सर्व पब्लिशिंगची जिम्मेदारी घेणार आहे. कंपनी भारतासाठी भविष्यात आपले PUBG अनुभव देण्याच्या पद्धती शोधत असते. ती आपल्या चाहत्यांसाठी स्वस्तात गेम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईटची फ्रेचाईजी चीनची सर्वात मोठी कंपनी टांसेन्ट कडे आहे. पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट दोन्ही पबजी कॉर्पोरेशन आणि टांसेन्ट गेम्सने मिळून बनवलं आहे.