PUBG खेळत असाल तर चुकूनही करू नका ‘ही’ चूक, अन्यथा व्हाल 10 वर्षांसाठी ‘बॅन’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्या मोबाईल गेम पबजीने तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. ही गेम योग्य की अयोग्य आणि तिचे दुष्परिणाम हे वादाचे मुद्दे आहेत. मात्र पबजी गेमच्या चाहत्यांसाठी आणि ती खेळणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पबजी गेम खेळताना एक चूक केल्यास गेमची कंपनी कडक कारवाई करत आहे. त्याबाबद्दल आम्ही याठिकाणी माहिती देत आहोत.

करू नका ही चूक :
जर आपण पबजी मोबाइल गेममध्ये पबजी चिकन डिनर जिंकण्यासाठी कोणतीही जुगलबंदी किंवा फसवणूक (पबजी हॅक्स आणि पबजी चीटिंग) करत असाल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण पबजीने गेममधील फसवणूक संपविण्यासाठी आणि चीटिंग करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांच्या या नवीन निर्णयानुसार, पबजीने शनिवारी अशा खेळाडूंवर १० वर्षांची बंदी जाहीर केली जे विकासकांच्या गेमिंग मानकांचे (डेव्हलपर्स गेमिंग स्टॅंडर्ड) उल्लंघन करतील.

तक्रारही करता येणार :
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की अनधिकृत थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्या किंवा गेम हॅक करणाऱ्या खेळाडूंना बंदी घातली जाईल. हॅक केल्यामुळे खेळाडूंना अयोग्य पद्धतीने लाभ मिळतो आणि हे अत्यंत चुकीचे आहे. गेम-इन रिपोर्टिंग प्रक्रियेद्वारे फसवणूक करणारे खेळाडू आणि चुकीच्या गेम्सविरूद्ध तक्रार करण्याचा पर्यायही वापरकर्त्यांना देण्यात येईल. तक्रारीची खात्री करुन घेतली जाईल आणि अशा खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच याद्वारे फसवणूक करणार्‍यांची नावे सार्वजनिक देखील केली जातील.

याआधीही कारवाई :
पबजी मोबाइल वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. जेणेकरून त्यांच्या खेळाडूंना चांगले आणि योग्य गेमिंग वातावरण मिळेल. याचेच एक उदाहरण म्हणजे कंपनीने सप्टेंबरमध्ये ३५०० हून अधिक खेळाडूंवर बंदी घातली आहे. त्यामुळे या खेळाडूंना आता पुढील १० वर्षे पबजी खेळता येणार नाही.

Visit : Policenama.com