‘PUBG’ Game बेतला जीवावर ; ‘तो’ प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या तरुणाईला पबजीचे वेड लागले आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मुलं अक्षरश: अॅडिक्ट  झाली आहेत. यातूनच एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाला पबजी खेळण्याची सवय भलतीच महागात पडली आहे. सलग 10 दिवस पबजी खेळणं या तरुणाला चांगलंच भोवलं आहे. 10 दिवस पबजी खेळल्यानंतर या तरुणां मानसिक संतुलन बिघडलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं आहे. तु्म्हाला विश्वास बसणार नाही परंतु हा तरुण एक फिटनेस ट्रेनर आहे. एक फिटनेस ट्रनेर असूनही त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. जम्मू-काश्मीरमधील ही घटना आहे.
हा तरुण मिशन पूर्ण करण्यासाठी सलग 10 दिवस पबजी गेम खेळत गेला. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या या फिटनेस ट्रेनरच्या मानसिक स्थितीवर यामुळे भलताच परिणाम झाला. यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पबजीच्या अतिरेकामुळे हे घडले असल्याचे समजत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पबजीच्या अतिरेकामुळे मानसिक स्थिती बिघडल्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार याआधी अशा प्रकारच्या 6 घटना समोर आल्या आहेत.
सदर तरुणाला रुग्णालयात नेल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, तरुणाची मानसिक स्थिती अद्यापही अस्थिर नाही. तरुणाचं मानसिक संतुलन काही प्रमाणात बिघडल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. ‘रुग्ण त्याच्या कुटुंबाला, नातेवाईकांना ओळखतो आहे. मात्र त्याच्या डोक्यावर पबजीमुळे प्रचंड परिणाम झाला आहे,’ असं डॉक्टर म्हणाले.
पबजी अशा एकेक घटना समोर येताना पाहून तेथील अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा खरंच एक गंभीर विषय होताना दिसत आहे. आता  जम्मूतील अनेकांनी पबजीवर बंदी घालण्याची मागणी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.